संगमनेरात आ. बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात ठिय्या आंदोलन
Sangamner News: सकल हिंदू समाज बांधवांना दंगलखोर म्हटले त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्या निषेधार्थ भाजपच्यावतीने शहरातील आ. थोरात यांच्या निवासस्थानाजवळ भाजपच्या वतीने एक तास धरणे आंदोलन (agitation ).
संगमनेर: हिंदू समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या त्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावत काळे झेंडे दाखवून मोर्चा काढण्यात आला होता. हिंदू समाज बांधवांची माफी मागा नाहीतर तुम्हाला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा भाजपचे पदाधिकारी यांनी दिला आहे. संगमनेरचे लोकप्रतिनिधी आ. बाळासाहेब थोरात हे सकल हिंदू समाज बांधवांना दंगलखोर म्हटले त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्या निषेधार्थ भाजपच्यावतीने शहरातील आ. थोरात यांच्या निवासस्थानाजवळ भाजपच्या वतीने एक तास धरणे आंदोलन केले. शहरात समाजाच्यावतीने 6 जून 2023 ला भगवा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्च्यात सहभागी झालेल्या सर्व बांधवांना आमदार बाळासाहेब थोरात हे दंगलखोर म्हटले त्यामुळे हिंदू, समाजाच्या भावना दुखवल्या गेल्या त्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावत काळे झेंडे दाखवून मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता.
मात्र त्या मोर्चाला पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारली म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाणता राजा रस्त्यावरच आ. थोरात यांच्या विरोधात घोषणाबाजी करत एक तास ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने पो. नि. भगवान मथुरे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी आ. थोरात यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला काळे फासून जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जोर्वे गावातील तरुणांना मारहाण झाली त्यांची साधी आ थोरात यांनी साधी विचारपूस सुद्धा केली नाही मात्र हिंदूसमाजाच्या मुलींना त्रास देणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात कुठलेही राजकारण न करता सकल हिंदू बांधवानी संगमनेरात मोर्चा काढला होता. त्या हिंदू समाज बांधवांना जर तुम्ही दंगलखोर म्हणून त्यांचा अपमान करत असेल तर हा हिंदू समाज तुम्हाला कदापीही माफ करणार नाही त्यामुळे तुम्ही हिंदू समाज बांधवांची माफी मागा नाहीतर तुम्हाला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा भाजपचे पदाधिकारी यांनी दिला आहे. यावेळी भाजप शहराध्यक्ष श्रीराम गणपुले, अमोल खताळ, भाजप तालुका अध्यक्ष सतिष कानवडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ अशोक इथापे, सुधाकर गुंजाळ, भाजपचे उपाध्यक्ष संदीप देशमुख आदी उपस्थित होते.
Web Title: Come to Sangamner Thiya agitation against Balasaheb Thorat
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App