सीईटीत कमी गुणांच्या भीतीने केली आत्महत्या
सीईटी परीक्षेत कमी मार्क मिळतील, त्यामुळे आई-वडिलांना वाईट वाटेल, या भीतीने २२ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
हिंगोली : सीईटी परीक्षेत कमी मार्क मिळतील, त्यामुळे आई-वडिलांना वाईट वाटेल, या भीतीने २२ वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना हिंगोली शहरातील एसआरपीएफ कॅम्प परिसरात १२ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. प्रवीण संजय गायकवाड असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
याबाबत सहायक पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड यांच्या खबरीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली.
Web Title: Committed suicide due to fear of low marks in CET
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App