Home अकोले अकोले ब्रेकिंग: अंगावर विजेचा खांब कोसळल्याने महिलेचा जागीच मृत्यू

अकोले ब्रेकिंग: अंगावर विजेचा खांब कोसळल्याने महिलेचा जागीच मृत्यू

Akole News: अंगावर विजेचा खांब कोसळल्याने अपघातात (Accident) गणोरे (Ganore) येथील महिलेचा जागीच दुदैवी मृत्यू.

Ganore Accident woman died on the spot after an electric pole fell on her body

अकोले: अकोले  तालुक्यातील गणोरे येथे दुर्दैवी घटना घडली आहे. अंगावर विजेचा खांब कोसळल्याने गणोरे येथील अलका नामदेव आंबरे (वय 55) यांचा जागीच दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी साडे चार वाजेच्या सुमारास घडली

तालुक्यातील गणोरे परिसरातील शिंदेवाडी परिसरात आज लाईट शट डाऊन असल्यामुळे बाभळीचे झाड तोडण्याचे काम सुरू होते. मात्र यावेळी बाभळीच्या झाडाची फांदी शेजारी असलेल्या वीज वाहक तारांवर कोसळली. तारांवर झाडाची फांदी कोसळल्यामुळे तारांना आणि विजेच्या खांबांना मोठा हादरा बसला. त्यामुळे एका लाईनमधील तीन पोल हे एकाच वेळी कोसळले. अलका आंबरे या याचवेळी आपल्या शेतात काम करीत होत्या. त्यांच्याजवळ देखील एक विजेचा खांब उभा होता.

झाडावर फांदी कोसळल्यामुळे या पोलवर देखील ताण आला, त्यामुळे हा पोल थेट अलका आंबरे यांच्या अंगावर कोसळला. पोलचा अंगावर कोसळण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना जबरदस्त मार लागला. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्य  झाला. विजेचा खांब कोसळल्याचा मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तात्काळ त्यांना अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मयत घोषित केले. अलका आंबरे यांच्या मृत्यूची  बातमी समजताच त्यांच्या नातेवाईकांनी एकच टाहो फोडला.

अकोले पंचायत समितीचे माजी सदस्य संत नामदेव आंबरे यांच्या त्या पत्नी होत्या. या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी अकोले ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली आहे .

Web Title: Ganore Accident woman died on the spot after an electric pole fell on her body

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here