Home अहमदनगर नगर जिल्ह्यातील तालुकानिहाय बारावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी

नगर जिल्ह्यातील तालुकानिहाय बारावीच्या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी

Ahmednagar HSC Result 2023:  नगर जिल्ह्यातून 33 हजार 142 मुले उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ही 90.51 टक्के आहे.

Ahmednagar HSC Result 2023

अहमदनगर: बारावी (HSC) 2023 च्या परीक्षेत नगर जिल्ह्यातून 33 हजार 142 मुले उत्तीर्ण झाले असून त्यांची टक्केवारी ही 90.51 टक्के आहे. तर 24 हजार 978 मुली पास होत त्यांची टक्केवारी ही 95.61 टक्के आहे. एकूण बारावी पास विद्यार्थ्यांची (Student) संख्याही 58 हजार 120 आहे. नगर जिल्हा हा पुणे (Pune) विभागात दुसर्‍यास्थानावर असून पहिल्या स्थानावर सोलापूर जिल्ह्याने बाजी मारली असून पुणे जिल्हा तिसर्‍या स्थानावर आहे. दूसरीकडे नगर जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेसाठी 57 हजार 295 टक्के विद्यार्थी हे नियमित पास झाले असून त्यांची टक्केवारी ही 93.67 टक्के आहे. मात्र, पास होणार्‍या विद्यार्थ्यांसह पुर्नपरीक्षार्थी यांच्यासह ही टक्केवारी ही 92. 63 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे.

जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आलेल्या आकडेवारीत नगर जिल्ह्यात बारावीसाठी रेग्यूलर आणि रिपिटर असे 58 हजार 120 पास झालेले आहेत. यात विज्ञान शाखेसाठी 20 हजार 256 विद्यार्थी यांनी नोंदणी केली होती. यातील 19 हजार 522 विद्यार्थी पास (Pass) झाले असून यात देखील 97.30 टक्के मुली आणि 96. 72 टक्के मुले पास झालेले आहेत. निकाल हा 96.98 टक्के लागला आहे.

कला विभागातून 14 हजार 731 विद्यार्थी पास झालेले असून यात 91. 7 टक्के मुली आणि 78.99 टक्के मुले पास झालेली आहेत. निकाल 83.57 टक्के निकाल लागलेला आहे. वाणिज्य विभागातून 7 हजार 822 विद्यार्थी पास झालेले असून यात 4 हजार 180 मुले आणि 3 हजार 642 मुलींचा समावेश आहे. या विभागात मुलींचा निकाल हा 96.68 आणि मुलांचा निकाल हा 91.14 टक्के लागले आहे. यासह व्होकेशनल आणि टेक्रिकल सायन्य असा मिळून 58 हजार 120 विद्यार्थी बारावीची परीक्षा पास झालेली असून यात 33 हजार 142 मुले ाणि 24 हजार 978 मुलींचा समावेश आहे.

तालुकानिहाय निकाल पास आणि कंसात टक्केवारी

अकोले 3 हजार 98 (88.19 टक्के), जामखेड 2 हजार 423 (92.55 टक्के), कर्जत 3 हजार 145 (96.59 टक्के), कोपरगाव 4 हजार 24 (93.52 टक्के), नगर 9 हजार 698 (94.49 टक्के), नेवासा 4 हजार 119 (93.31 टक्के), पारनेर 2 हजार 800 (93.52 टक्के), पाथर्डी 4 हजार 871 (91.65 टक्के), राहाता 4 हजार 371 (90.72), राहुरी 2 हजार 973 (90.92), संगमनेर 6 हजार 109 (91.92), शेवगाव 4 हजार 35 (97.39), श्रीगोंदा 2 हजार 985 (92.10) आणि श्रीरामपूर 3 हजार 389 (87.82 टक्के) आहे. नगर जिल्ह्यात असणार्‍या जुनिअर कॉलेज 12 वीच्या उच्च माध्यमिक महाविद्यालयापैकी 103 विद्यालयाचा निकाल हा शंभर टक्के लागला आहे.

Web Titie: Ahmednagar HSC Result 2023

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here