Home क्राईम संगमनेरात गुटखा विक्री करणार्‍या विरोधात कारवाई

संगमनेरात गुटखा विक्री करणार्‍या विरोधात कारवाई

Sangamner Crime: बेकायदेशीरच्या गुटखा विक्री करताना आढळल्याने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा (Raid) टाकला, 38 पुडे गुटखा व एक मोटरसायकल असा एकूण 32 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Raid against gutkha sellers in Sangamner

संगमनेर: संगमनेर शहर व परिसरात खुलेआम गुटखा विक्री सुरू असल्याने शहर पोलीस अधिकार्‍यांनी अवैध गुटखा विक्री व्यवसायाकडे लक्ष घातलेले आहे. गुटखा विक्रीला परवाना नसतानाही बेकायदेशीरच्या गुटखा विक्री करताना आढळल्याने पोलिसांनी एका गुटखा विक्री करणार्‍या विरोधात कारवाई केल्याची घटना सोमवारी सायंकाळी शहरातील नाईकवाडपुरा परिसरात घडली. या दुकानातून विविध कंपन्यांचा 38 पुडे गुटखा व एक मोटरसायकल असा एकूण 32 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विक्री करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरातील गुटखा विक्री करणार्‍यां विरोधात तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. शहरातील नाईकवाडपुरा परिसरात गुटखा विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत दोन हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. गुटखा विक्री करणार्‍याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Raid against gutkha sellers in Sangamner

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here