अकोले: डॉ. किरण लहामटे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अधिकृत उमेदवारी
अकोले: अकोले विधानसभा मतदार संघात पिचड यांचे कट्टर विरोधक असलेले जिल्हा परिषद सदस्य डॉ. किरण लहामटे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिनांक ३ ऑक्टोबर रोजी ते अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले आहे. दरम्यान त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यासाठी जेष्ठ नेते अशोक भांगरे यांनी मोठेपणा दाखविल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
अकोले विधानसभा मतदार संघाची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी सुनिता भांगरे व किरण लहामटे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र अकोले तालुक्याच्या जनतेचा कौल जाणून घेऊन शरद पवार आणि अजित पवार यांनी डॉ. किरण लहामटे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
Website Title: Latest News official candidacy from NCP Kiran Lahamte