सासूच्या चहात बेशुद्धीचे औषध टाकले, आणि जावयाने केला बलात्कार, वर अश्लिल फोटो काढून…
Mumbai Crime: एका जावयाने आपल्या सासूला चहातून बेशुद्धीचे औषध पाजून तिला बेशुद्ध करीत तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याचे समोर आले.
मुंबई : सासु आणि जावयाचे नाते आई आणि मुलाप्रमाणे असते. परंतू एका जावयाने अक्षरश: सासू आणि जावयाच्या पवित्र नात्यालाच काळीमा फासत असे काही केले ही चारचौघात तिला तोंड लपवायला जागा उरलेली नाही. एका जावयाने आपल्या सासूला चहातून बेशुद्धीचे औषध पाजून तिला बेशुद्ध करीत तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या सासूने अखेर कोर्टात धाव घेत जावयाची तक्रार केली आहे.
युपीच्या बांदा येथील या जावयाने हा माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार केला आहे. त्याने आपल्या सासूच्या चहात नशेचा पदार्थ टाकून तिला बेशुद्ध केले. त्यानंतर त्याने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तिची अश्लिल छायाचित्रेही आपल्या मोबाईल फोनवर काढली. त्यानंतर ही छायाचित्रे दाखवून त्याने तिला ब्लॅकमेल करायला सुरूवात केली. तिला पुन्हा तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले. परंतू सासू त्याच्या वासनेला हाणून पाडत त्याला स्पष्ट नकार दिल्याने त्या वासनांध जावयाने तिची छायाचित्रे थेट व्हायरल केल्याने त्याच्या सासूला कुठेही तोंड दाखवायलाही जागा उरली नाही. सासूने त्यानंतर पोलिस तक्रार केली. परंतू पोलीसांनी देखील दखल न घेतल्याने अखेर या सासूला कोर्टाचे दरवाजे ठोठावावे लागले. अखेर कोर्टाच्या आदेशाने या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
Web Title: Mother-in-law put an anesthetic in her tea, and son-in-law rape
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App