Home क्राईम वहिनी, चला माहेरी सोडतो; पतीसोबत वादानंतर घर सोडून निघाली, अन रस्त्यात विवाहितेवर...

वहिनी, चला माहेरी सोडतो; पतीसोबत वादानंतर घर सोडून निघाली, अन रस्त्यात विवाहितेवर अत्याचार

Beed Crime:  गावी सोडण्याच्या बहाण्याने महिलेला निर्मनुष्य ठिकाणी नेत लैंगिक अत्याचार (Sexual abused)केल्याची घटना.

She left home after an argument with her husband, and Sexual abused the married woman 

बीड : बीडमधून संतापजनक घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरुन पतीसह वाद झाला आणि विवाहितेने बॅग भरुन माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी घराच्या बाहेर पडलेल्या महिलेला एका युवकाने गावी सोडण्याच्या बहाण्याने बाईकवर बसवले. त्यानंतर तिची परिस्थिती ऐकून संधीचा गैरफायदा घेतला. तरुणाने महिलेला निर्मनुष्य ठिकाणी नेत लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपी युवकाला अटक करण्यात आली असून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

पतीसह किरकोळ कारणावरुन वाद झाला आणि यातूनच विवाहितेने माहेरी जाण्याचा विचार केला. काही क्षणातच महिलेने आपले कपडे, साड्या बॅगेत भरून माहेरचा रस्ता धरला. मात्र यावेळेस सतत लक्ष ठेवून असलेल्या एका व्यक्तीने या गोष्टीचा फायदा घेतला.

“मी तुम्हाला तुमच्या माहेरी सोडतो, तुम्ही माझ्यासोबत माझ्या दुचाकी वर चला” असं म्हणत आरोपी विशाल रवींद्र कदम (वय वर्ष २२, राहणार शहाबादपूर तालुका जिल्हा बीड) या व्यक्तीने त्यांना विनवणी केली. रागाच्या भरात संतापलेल्या त्या महिलेने त्याच्या गाडीवर बसत आपल्या माहेरची वाट धरली.

रस्त्यातच आरोपीने या सगळ्या गोष्टीच्या चर्चेचा आढावा घेतला. अर्ध्या रस्त्यातच एका निर्मनुष्य ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केला. यानंतर त्याने त्या ठिकाणाहून पलायन केलं.

या घटनेनंतर ज्या पतीसह वाद झाला, त्याच्याकडेच परत जाऊन महिलेने घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर दोघांनी बीड शहर पोलीस ठाणे गाठले. पीडितेने सांगितल्याप्रमाणे अत्याचार करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत काही तासातच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. न्यायालयाकडून आरोपीला पाच दिवसांची कोठडी सुनाविण्यात आली आहे.

Web Title: She left home after an argument with her husband, and Sexual abused the married woman 

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here