अकोले ब्रेकिंग: निळवंडे धरणातून शेती व पिण्याचे आवर्तन सोडले
Akole Nilwande Dam: शेती व पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन सोडण्यात आले असल्याची माहीती भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.
अकोले: निळवंडे धरणातून आज रविवारी सायं.6 वाजता 600 क्यूसेकने शेती व पिण्याच्या पाण्यासाठीचे आवर्तन सोडण्यात आले असल्याची माहीती भंडारदरा धरणाचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी दिली.
हे आवर्तन साधारणतः 20 ते 25 दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. भंडारदरा प्रकल्प लाभक्षेत्रासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरलेल्या नियोजनानुसार निळवंडे धरणातून उन्हाळी हंगाम सिंचन व बिगर सिंचन आवर्तन क्र.२ आज रविवारी सायं.6 वाजता 600 क्यूसेक विसर्गाने सुरू करण्यात आले आहे.
आवर्तन सोडतेवेळी 11 हजार 39 दलघफु क्षमतेच्या भंडारदरा धरणात 6 हजार 579 दलघफू व 8 हजार 320 क्षमतेच्या निळवंडे धरणात 4 हजार 757 दलघफू पाणी शिल्लक होते. भंडारदरा धरणात 59:60 टक्के तर निळवंडे धरणात 57:12 टक्के पाणी शिल्लक आहे.
Web Title: Agriculture and drinking cycle left from Nilwande Dam
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App