धक्कादायक! प्रेयसीच्या लहानग्याला उकळत्या पाण्यात बुडवून मारलं
प्रेयसीच्या लहानग्या मुलाला गरम पाण्यात बुडवून मारल्याच्या आरोपावरून पुण्यातील एका व्यक्तीला अटक.
पुणे: आपल्या प्रेयसीच्या लहानग्या मुलाला गरम पाण्यात बुडवून मारल्याच्या आरोपावरून पुण्यातील एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. आरोपीचे महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
विक्रम शरद कोळेकर असं या आरोपीच नाव असून तो खेड इथं राहतो. मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीच्या आधारे त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ६ एप्रिल रोजी सकाळी विक्रम शरद कोळेकर याने खेड इथं महिलेच्या घरी जाऊन तिच्या लहान मुलाला उचलून उकळत्या पाण्यात बुडवलं. यावेळी ही महिला बाहेर गेली होती. तिने आरोपीला थोडा वेळ आपल्या मुलाकडे पाहायला सांगितलं होतं.
यामध्ये बाळाचं संपूर्ण शरीर भाजलं गेलं आहे. ६ एप्रिल रोजी या अर्भकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण १५ दिवसांनंतर त्याचा मृत्यू झाला. ही महिला पतीपासून वेगळी राहत होती. तिने विक्रमला लग्नासाठी नकार दिला होता. त्यामुळे नाराज असलेल्या प्रियकराने ही कृती केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिला आणि तिच्या बहिणीला इजा करण्याची धमकी दिली. आरोपी आता पोलीस कोठडीत असून पोलीस हत्येमागील कारणाचा शोध घेत आहेत.
Web Title: Girlfriend’s baby was murder by drowning in boiling water
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App