अहमदनगर: दोन गटामध्ये तुफान हाणामारी, कट्ट्यातून गोळीबार
Ahmednagar News: व्यवसाय चालविण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी कट्ट्यातून गोळीबार (Firing) करण्यात आला.
श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये काल सोमवारी रात्री व्यवसाय चालविण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये तुफान हाणामारी झाली. यावेळी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी एका तरूणास ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 2 मध्ये काल सोमवारी रात्री व्यवसाय चलविण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये अगोदर बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे पर्यावसन तुफानी हाणामारीत झाले. दोघा – तिघांना बेदम मारहाण केली. यातील एका गटातील एकाने गावठी कट्टा काढून गोळीबार केला. यात गोळी कोणाला लागली नसली तरी परिसरातील वातावरण मात्र तणावाचे बनले होते.
या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी फौजफाटा घटनास्थळी दाखल होताच त्यांनी हाणामार्या करणार्या तरूणांची धरपकड सुरू केली. यात हे टोळके पसार झाले. पण पोलिसांना एकास ताब्यात घेण्यात यश आले. तोही जखमी झाल्याने त्यास रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात येत आहे. यातील आणखी एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. गोळीबार झाला नसून त्याबाबत अद्याप काहीही माहिती मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरात काही भागात तणावाचे वातावरण पसरल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Web Title: Clash between two groups, firing from Katta
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App