खंडणी न दिल्याने गुंडाकडून युवकाची हत्या- Murder
Washik Crime: खंडणी न दिल्याने कुख्यात गुंडाने एका युवकाची हत्या (Murder) केल्याची घटना.
कारंजा लाड | वाशिम: खंडणी न दिल्याने कुख्यात गुंडाने एका युवकाची हत्या केल्याची घटना अमरावती जिल्ह्यातील वरुड बु. येथे घडली. मृत युवक हा धनज बु. (ता. कारंजा लाड) येथील आहे. पोलिसांनी आरोपीस तीन तासात अटक केली.
धनजमधील केवल माणिकराव सोनटक्के (२७) हा वरूडमध्ये ऑनलाइन लॉटरीचे दुकान चालवित होता. त्याच्याकडे फंट्या उर्फ दीपक अशोक कावनपुरे या कुख्यात गुंडाने पैशांची मागणी केली. मात्र, पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने केवलच्या मानेवर चाकूने वार केला. नागरिकांनी केवलला वरुडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
Web Title: Youth Murder by goon for non-payment of ransom
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App