तब्बल २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना सहायक निबंधकाला अटक
सावकारीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून एका खासगी सावकाराकडून तब्बल २० लाख रुपयांची लाच (Bribe) स्वीकारताना सहायक निबंधकाला अटक.
नाशिक : सावकारीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून एका खासगी सावकाराकडून तब्बल २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना निफाड तालुक्यातील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक रणजित महादेव पाटील व वरिष्ठ लिपिक प्रदीप अर्जुन वीर नारायण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. २०) सायंकाळी सापळा रचून रंगेहात अटक केली आहे.
निफाड तालुक्यातील सहकारी संस्थांचे सहायक निबंधक रणजित पाटील यांच्याकडे सिन्नर तालुक्याचा अतिरिक्त कार्यभार असून त्यांनी एका खासगी सावकाराला सावकारीचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवून त्याच्याकडून लाच मागितली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाटील यांना ही लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांच्या मुंबईनाका येथील राहत्या घरी रंगेहात पकडले आहे. मागील तीन ते चार दिवसांपासून संबंधित सावकाराला पाटील यांच्याकडून वारंवार गुन्हा दाखल करण्याची भीती दाखविली जात होती. तसेच लाचेची रक्कम दिल्यास सावकारी प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल न करण्याचे आश्वासन देत संशयितांकडून लाच मागितली जात असल्याने आहे. सावकाराने पाटील यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून त्यांना मुंबई नाका भागातून तब्बल २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे सांगितले.
लाचलुचपत विभागाने लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलेले सहायक निबंधक रणजित पाटील हे मूळचे सांगली जिल्ह्यातील आहेत. मात्र त्यांचे मुंबईसह अन्य मेट्रो शहरांमध्येही आलिशान फ्लॅट असल्याची माहिती समोर येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
रणजित पाटील यांच्या घराची झडती
लाचलुचपत विभागाने निफाडचे सहायक निबंधक रणजित पाटील यांना २० लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.त्यामुळे त्यांच्याकडे आणखी मोठ्या प्रमाणात घबाड सापडण्याची शक्यता असल्याने लाचलुचपत विभागाचे शोधपथक पाटील यांच्या मुंबई नाका येथील पॅरामाउंट अपार्टमेंटमधील घराची झडती घेण्यासाठी पोहोचले आहे.
Web Title: Assistant Registrar arrested while accepting bribe of Rs.20 lakh
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App