संगमनेर: विहिरीच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू
Sangamner News: संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे मित्राकडे आलेल्या एका १९ वर्षीय तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना.
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे मित्राकडे आलेल्या एका १९ वर्षीय तरुणाचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.
ऋत्विक दीप शिशुपाल (वय १९, रा. नाशिक ) हल्ली रा. म्हाळुंगी पडवळ मंचर, ( जि. पुणे) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अभिषेक नवनाथ गवांदे हा संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी या ठिकाणी राहत आहे. त्याचा मित्र ऋत्विक दीप शिशुपाल हा कोल्हेवाडी येथे आला असता शुक्रवारी (दि. २४) विहिरीचे पाण्यात पोहण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडून मयत झाला. त्यानंतर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयमध्ये त्याचा मृतदेह नेला असता, वैद्यकीय अधिकारी यांनी ऋत्विक शिशुपाल हा मयत झाल्याचे घोषित केले. याबाबत अभिषेक गवांदे यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास ढूमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक औटी करीत आहे.
Web Title: Sangamner Youth drowned in well water
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App