‘ती’ तीन दिवसांपासून बेपत्ता, तो तिला जंगलात घेऊन गेला अन….
Nagpur Crime: एका ४० वर्षीय महिलेचे अनैतिक संबंध असल्याचा संशयातून जंगलात नेऊन दगडाने ठेचून हत्या (Murder) केल्याची घटना उघडकीस आली आहे. महिला बेपत्ता असल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.
नागपूर: नागपुरात प्रियकराने जंगलात नेऊन महिलेची निर्घुण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिघोरीतील एका ४२ वर्षीय महिलेचे ४० वर्षीय पुरुषाशी अनैतिक संबंध होते. त्याला तिचे आणखी कुणाशीतरी अफेअर असल्याचा संशय होता. तू माझ्याशी फिरायला येते आणि दुसऱ्याशी असलेले संबंध त्याला पसंत नव्हते. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. २३ मार्चला तो तिला घेऊन हिंगणा हद्दीतील जंगलात घेऊन गेला. तिथ त्यांच्यात वाद झाला. या वादातून त्याने तिला दगडाने ठेचले. इकडे ती घरी आली नव्हती. त्यामुळे घरच्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती.
वाठोडा परिसरातून 45 वर्षीय श्वेता (नाव बदललेलं) महिला मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होती. तीन दिवसानंतर बेपत्ता महिलेचा मृतदेह हिंगणा हद्दीत बनवाडी शिवार येथे आढळला. आरोपीला वाठोडा पोलिसांनी अटक केली.
श्वेता ही ४५ वर्षीय महिला दिघोरीत राहत असे. तिची दीपक इंगळे या ४० वर्षीय तरुणासोबत जवळीकता होती. श्वेताला कुटुंबात पती, मुलगा आणि मुलगी आहे. दीपक हा स्टार बसमध्ये चालक आहे. श्वेता त्याच्याशी नेहमी फोनवर बोलत असे. शिवाय तो तिच्या घरीही येत होता. तो मानलेला भाऊ असल्याचं घरी सांगायची.
दीपकला तिचे आणखी कुणाशीतरी संबंध असल्याची कुणकुण लागली. त्यामुळे तो संतापला होता. २३ मार्चला तो श्वेताला घेऊन रूई शिवारात गेला. त्यांच्यात वाद झाला. यातून दीपकने श्वेताच्या कपाळावर डाव्या बाजूला मारून हत्या केली.
दरम्यान श्वेता बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी २४ मार्च रोजी वाठोडा पोलिसांत केली होती. दीपकवर संशय असल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. २३ मार्चला दीपकने श्वेताला जंगलात संपवले होते. दोन दिवसानंतर तिचा मृतदेह सापडला.
Web Title: Murder Case suspicion of having an immoral relationship, he was taken to the forest and stoned to death
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App