अहमदनगर ब्रेकिंग: लग्नांनंतर सासरी आलेली नवरी तिसऱ्याच दिवशी गायब
Ahmednagar News: राहुरीतील तरुणाची फसवणूक, सात जणांवर गुन्हा दाखल. नातेवाईक यांच्यासोबत निघून गेली ते परत आलीच नाही.
राहुरी | Rahuri News: दोन लाख रुपये घेऊन लग्न केलेल्या नवरीने सासरी आल्यानंतर तिसर्या दिवशी रात्रीच्या दरम्यान तीच्या नातेवाईकांसह पलायन केल्याची घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात सात जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक भाउसाहेब खेमनर (वय 28) हा तरूण राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे राहत असून तो महात्मा फुले कृषी विदयापीठ येथे कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करतो.
अशोक खेमनर याला लग्नासाठी मुलगी शोधण्याचे काम सुरू होते. त्याच्या एका नातेवाईकाने मुलगी पाहीली असून दोन लाख रूपये द्या, असे फोन करून सांगीतले. तेव्हा अशोक खेमनर हा तरूण त्याच्या आई वडीलांसह पारनेर येथे गेला. तेव्हा मुलगी हिंगोली येथे असल्याचे त्यांना सांगीतले. त्यानुसार 3 जुलै 2022 रोजी अशोक खेमनर हा आई वडिल नातेवाईकांसह अनिता रामचंद्र अग्रवाल (रा. बाळापुर आखाडा, ता. कळनोरी, जि. हिंगोली) या महिलेच्या घरी गेले. तेथे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला.
मुलगा व मुलीची एकमेकांची पसंती झाली. मात्र दोन लाख रुपये द्यावे लागतील तरच लग्न होईल. अशी अट मुलीच्या नातेवाईकांनी घातली. अशोक खेमनर याने वेळोवेळी संबंधित लोकांना 1 लाख 85 हजार रूपये दिले. त्यानंतर 5 जुलै 2022 रोजी अशोक खेमनर या तरूणाचे लग्न सोनी शंकर पाटील (रा. आनंदनगर, जुनी वस्ती, सारसी बडनेरा अमरावती) या तरूणी बरोबर लावण्यात आले. अशोक खेमनर हा नवरीला घेऊन राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा येथे त्याच्या घरी आला. त्यानंतर दिनांक 8 जुलै 2022 रोजी अशोक खेमनर याची पत्नी सोनी हीचे नातेवाईक आले.
सदर लोक हे अशोक खेमनर याच्या घरी मुक्कामाला थांबले. रात्री जेवण केल्यानंतर सर्वजण एकाच घरात झोपले. दिनांक 9 जुलै 2023 रोजी रात्री एक वाजेच्या दरम्यान अशोक खेमनर याची पत्नी व तीचे नातेवाईक घरातून गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांचा शोध घेतला असता ते कोणीही मिळुन आले नाही. दिनांक 9 जुलै रोजी अशोक खेमनर याने मध्यस्थी लोकांना चौकशी केली असता सदर मुलगी तिचे नातेवाईकांसोबत निघुन गेली. आम्ही दोन तीन दिवसात मुलीला तुमच्या घरी आणुन घालू असे सांगीतले. मात्र, अद्याप पर्यंत अशोक खेमनर याची पत्नी आली नाही.
लग्न लावून आपली 1 लाख 85 हजार रूपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर 17 मार्च 2023 रोजी अशोक खेमनर याने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. अशोक भाउसाहेब खेमनर याच्या फिर्यादीवरून चंदु सिताराम थोरात (रा. ढवळपुरी ता. पारनेर), भाउसाहेब वाळुंज (रा. टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर), शाम वाबळे (रा. वासुंदे, ता. पारनेर), अनिता रामचंद्र आग्रवाल (रा. बाळापुर आखाडा, ता. कळनोरी, जि हिंगोली), सुनिल शरद कांबळे (रा. शिवाजीनगर, उस्मानाबाद), राहुल पाटील. सोनी शंकर पाटील (रा. आनंदनगर, जुनी वस्ती सारसी, बडनेरा, अमरावती) या सात जणांवर गुन्हा रजि. नं. 295/2023 भादंवि कलम 420, 406, 34 प्रमाणे फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Ahmednagar Crime After the marriage, the wife who came as in-law disappeared on the third day
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App