स्पामध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री! शरीरसुखासाठी महिला पुरवताच….
मसाज च्या नावाखाली देहविक्री (Prostitution) करणाऱ्या स्पावर छापा (Raid) टाकून, स्पा चा मॅनेजरसह पाच जणांवर गुन्हा.
नवी मुंबई: मसाज च्या नावाखाली देहविक्री करणाऱ्या स्पावर छापा टाकून सिबीडी पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सीबीडी सेक्टर १५ येथे स्पर्श या स्पा मध्ये मसाजच्या नावाखाली देहविक्री चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याद्वारे वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे यांनी सहायक निरीक्षक पराग लोंढे, उपनिरीक्षक निलेशकुमार जगताप यांचे पथक तयार केले होते. या पथकाने सोमवारी रात्री त्याठिकाणी बनावट ग्राहक पाठवले होते. या ग्राहकाला मसाजच्या नावाखाली शरीरसुखासाठी महिला पुरवताच त्याठिकाणी छापा टाकण्यात आला. त्यामध्ये त्याठिकाणी चार महिला व स्पा चा मॅनेजर असे पाचजण आढळून आले. स्पा मध्ये छोट्या खोल्या तयार करून त्याठिकाणी मसाजसाठी येणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त शुल्क घेऊन महिला पुरवल्या जात होत्या. याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Prostitution in the name of massage in the spa! As soon as women provide for bodily pleasure
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App