धक्कादायक घटना: प्रमोशनसाठी हपपलेल्या नवऱ्याने बायकोला बॉससोबतच रात्र घालवण्यासाठी दबाव
Pune Crime: प्रमोशन हवं होतं यासाठी तो आपल्याच पत्नीला बॉसच्या वासनेची शिकार, बॉससोबत एक रात्र घालवण्यासाठी दबाव टाकल्याचं सांगितलं.
पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक आणि पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्याच पत्नीला दुसऱ्या परपुरूषासोबत रात्र घालवण्यासाठी सांगितली.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील ही घटना असून मूळच्या इंदूर इथल्या एका महिलेने तिच्या पतीवर गंभीर आरोप केला आहे. लग्नानंतर तिचा पती वाईट संगतीत पडतो तेव्हापासूनच त्याने अनेकवेळा चुकीच्या गोष्टींसाठी तो तिच्यावर दबाव टाकायचा. महिलेने आपल्या पतीवर आरोप करताना, बॉससोबत एक रात्र घालवण्यासाठी दबाव टाकल्याचं सांगितलं. कारण त्याला प्रमोशन हवं होतं यासाठी तो आपल्याच पत्नीला बॉसच्या वासनेची शिकार बनवत होता. अमित छाबरा असं संबंधित पतीचं नाव आहे.
महिलेने तिच्या पतीच्या भावावरही आरोप केला आहे. दीर तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा इतकंच नाहीतर तिच्या 12 वर्षांच्या मुलीसमोरही त्याने अनेकवेळा अश्लीलकृत्य केलं आहे. याविरूद्ध तिने आवाज उठवला तेव्हा तिलाच मारहाण करण्यात येत होती. तक्रार करणाऱ्या महिलेने कथितरित्या तिच्या हाताची नस कापण्याचाही प्रयत्न केला होता. 2022 मध्ये या अत्याचाराला कंटाळून ती माहेरी परतली होती.
तिच्यासोबत होणाऱ्या प्रकराबद्दल तिने माहेरच्यांना कोणतीच माहिती दिली नाही. मात्र जेव्हा हे डोक्यावरूनच जायला लागलं तेव्हा तिने घरी येत सर्व काही सांगितलं. पोलिसांनी पतीला बोलावूत घेत, त्रास देऊ नको अशी तंबी दिली. पोलिसांनी तसं त्याच्याकडून लेखीही लिहून घेतलं. मात्र काही दिवसानंतर सासरच्यांनी पुन्हा अत्याचार सुरू केला. त्यानंतर महिलेच्या पालकांनी इंदूरच्या न्यायालयात अर्ज दाखल केला. न्यायालयाने महिला कल्याण अधिकार्यांना तपासाचे आदेश दिले होते, त्यानंतर पती, संसा आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: Crime Hustle cheated for promotion pressures wife to spend night with boss
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App