‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ घोषणा देत सरकारी कर्मचाऱ्यांचा अकोले तहसीलवर महाएल्गार
‘One Mission, Old Pension’ जुनी पेन्शन योजना व सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर नगर पंचायती, महसूल कर्मचारी समन्वय समितीमार्फत मंगळवार, दि. १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर.
अकोले: जुनी पेन्शन योजना व सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी-निमसरकारी शिक्षक, शिक्षकेतर नगर पंचायती, महसूल कर्मचारी समन्वय समितीमार्फत मंगळवार, दि. १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले अहोत. या संपात सुमारे हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत.
अकोले तालुक्यातील सर्वच सरकारी कर्मचारी संघटनांनी मंगळवारी शहरातील सरकारी कर्मचारी शासकीय अगस्ती विद्यालयात जमा झाले. तेथून सर्व कर्मचाऱ्यांचा मोर्चा पायी चालत अकोले बस स्थानक मार्गस्थ होऊन तहसील कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. मोर्च्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.. ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला. वर्ग ३ पासून सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत त्यामुळे कार्यालये ओस पडली होती. विद्यालयातील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली. या मोर्चात शिक्षक बहु संख्येने उपस्थित होते.
गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित आहेत. यासंदर्भात विविध संघटनांनी चर्चा, निवेदने दिले. मात्र, त्यावर कार्यवाही झाली नाही. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करू नका, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत अन्यासित प्रगती योजनेचा लाभ द्या वगैरे मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे कर्मचारी-शिक्षकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर ठाम राहत असून मागण्या मान्य होइपर्यंत संप मागे घेण्यात येणार नाही, अशी माहिती उपस्थित पदाधिकारी यांनी दिली. यावेळी नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
या आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या शासन मान्यतेसंदर्भात शासनादेश पारित करा, नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करा, सर्व रिक्त पदे तत्काळ भरा, सर्वांना समान किमान वेतन देऊन, कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घ काळ सेवेत असल्यामुळे त्यांच्या सेवा नियमित करा, नवीन शिक्षण धोरण रद्द करा, निवृत्तीचे वय ६० वर्षे करा. नर्सेस, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तत्काळ निराकरण करा यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
Web Title: government employees at Akole Tehsil proclaiming ‘One Mission Old Pension’
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App