Home अहिल्यानगर अहमदनगर: गावठी कट्टा बाळगणारा काडतुसांसह तरुण ताब्यात

अहमदनगर: गावठी कट्टा बाळगणारा काडतुसांसह तरुण ताब्यात

Ahmednagar News: श्रीरामपूर पुणतांबा रस्त्यावरील हॉटेलजवळ एका तरुणाला गावठी कट्टा व दोन काडतुसांसह ताब्यात.

Gavathi katta carrying youth with cartridges in custody

श्रीरामपूर | Shrirampur: नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर पुणतांबा रस्त्यावरील हॉटेलजवळ एका तरुणाला गावठी कट्टा व दोन काडतुसांसह ताब्यात घेतले.

आरोपीचे नाव प्रवीण ऊर्फ पावव्या सुरेश साळुंखे (वय २३) असे आहे. आरोपीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी साळुंखे हा मूळचा वैजापूर तालुक्यातील असून सध्या निमगाव खैरी येथे वास्तव्यास आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. ९ मार्चला रात्री अकरा वाजेच्या सुमारास आरोपी साळुंखे हा संशयास्पदरीत्या दिसून आला होता. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्याच्या कंबरेला गावठी कट्टा आढळून आला. निमगावखैरी शिवारात ही कारवाई करण्यात आली.

निमगाव खैरी येथील प्रशांत ऊर्फ पांडू साईनाथ लेकुरवाळे याच्याकडून हा कट्टा विकत घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पोलिस नाईक शंकर चौधरी यांनी फिर्याद दाखल केली आहे.

Web Title: Gavathi katta carrying youth with cartridges in custody

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here