Home अकोले अॅड. डॅा .बाळ ज बोठे पाटील यांना  राज्यस्तरीय आदर्श पञकारीता पुरस्कार

अॅड. डॅा .बाळ ज बोठे पाटील यांना  राज्यस्तरीय आदर्श पञकारीता पुरस्कार

अकोले: पञकारीतेत बाजारपणा झाल्याने तळमळीने काम करणारे पञकार अपवादात्मकच सापडतात राजकीय दबाब व जाहिरात धंदा यामुळे पञकारीतेतील विश्वासहर्ता संपत असताना  अंधारात दिवा लावण्याचे काम जेष्ठ पत्रकार बाळ बोठे व कै सूर्यभान सहाणे करत असल्याचे मत जेष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांनी व्यक्त केले.
       महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या वतिने पञकार सुर्यभान सहाणे याच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त दैनिक सकाळ चे कार्यकारी संपादक अॅड डॅा बाळ ज बोठे पाटील यांना  राज्यस्तरीय आदर्श पञकारीता पुरस्कार पञकार हेमंत देसाई व संगमनेरच्या प्रथम महिला नगराध्यक्षा साै दुर्गाताई तांबे यांचे हस्ते देण्यात आला. यावेेळी कीर्तनकार  ह.भ.प सोनाली साखरे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, जेष्ठ नेते गिरजाजी जाधव, मिनानाथ पांडे, अमृतसागर दुध संघाचे व्हा चेअरमन रावसाहेब वाकचाैरे, संचालक भाऊपाटील नवले, अजित सहाणे, चंद्रकांत सहाणे, श्रीमती रजनी सहाणे व्यासपीठावर उपस्थित होते.
   यावेळी देसाई म्हणाले की, सध्या छापील पञकारीता कमी होत असुन डिजिटल पेपर ( इ पेपर)कडे लोक जात आहे परदेशात महाराष्ट्रियन लोक इंटरनेट द्वारे  वर्तमानपत्र चा डिजिटल अंक जास्त प्रमाणात वाचतात. आज देशात व राज्यात वर्तमानपत्र मोडकळीस येऊ लागले असुन ते टिकवण्यासाठी वर्तमानपत्र आर्थिक व राजकीय दबावाखाली येऊ लागल्याने पञकाराना तडजोड न करता काम करणे अवघड झाले आहे त्यातही काही लोक तळमळीने काम करत आहे त्याचा आदर केला पाहिजे .आज सर्व स्तरातील प्रत्येक माणूस पैश्यामागे धावत आहे तसेच  पञकारीता ही आज व्यावसायिक पञकारीता झाली अाहे. वर्तमानपत्राचे भविष्य टिकवायचे असेल तर वर्तमान पञातुन तरुण पिढीला गरजेचे असलेले विज्ञानाचे ज्ञान दिले पाहिजे, सरकारच्या विविध योजनाचे मुल्य मापन केले पाहिजे तरुणांना उद्योजकता विकास कार्यक्रमा बाबत माहिती प्रसिद्ध केली पाहिजे समाज प्रतिभावंत होत असताना पञकारांनीही प्रतिभावंत झाले पाहिजे पञकारानीही सत्ताधाऱ्यांची मक्तेदारी न करता चांगल्या विरोधकाची भुमिका बजावली पाहिजे 
             यावेळी दुर्गाताई तांबे, मिनानाथ पांडे, बी.एम महाले, सोनवणे याची भाषणे झाली कार्यक्रमाचे स्वागत सुञसंचलन अनिल रहाणे यांनी प्रास्तविक संघटनेचे राज्य सचिव विश्वासराव आरोटे व आभार माजी पं.स.सदस्य अरुण शेळके यानी केले यावेळी पञकार संघाचे तालुकाध्यक्ष अशोक उगले भाऊसाहेब वाकचाैरे, विजय पोखरकर, शांताराम गजे, डि.के. वैद्य, अमोल वैद्य, हेमंत आवारी, अल्ताप शेख,  गणेश रेवगडे, प्रकाश आरोटे ,दत्ता हासे, रमेश खरबस, अनिल नाईकवाडी, निलेश सोनवणे,महेश देशमुख, महेश दिघे सह मोठ्या संख्येने सहाणे परीवाराचे नातेवाईक, पञकार व ग्रामस्थ उपस्थित होते.
कोट ००१ 
सत्काराला उत्तर देताना अॅड डॅा बाळ बोठे म्हणाले प्रत्येक विषयावर अचुक विश्लेषण करणारे स्व सुर्यभान सहाणे सर याची पञकारीता आपण जवळून पाहिली आहे आज  त्याच्या स्मृती पित्यर्थ देण्यात येणारा पहिला पुरस्कार आपल्याला दिला याबद्दल आभार मानून पुरस्काराची देण्यात आलेली रक्कनमेत तेवढ्याच रक्कमेची भर घालून पुढील वर्षीच्या पुरस्कारासाठी दिली.
Website Title: Bal J Bothe Patil Award for State Level Ideal Recognition

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here