शिक्षकांना बी.एल.ओ.ची कामे देऊ नये: शिक्षक भारती संघटना
Ahmednagar: माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना प्राध्यापकांना बी.एल.ओ.ची कामे देऊ नये. निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष भेटून शिक्षक भारती संघटना.
अकोले: ज्ञानदानाचे पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे की मतदान केंद्रस्तरीय (बी. एल. ओ.) ची कामे करायची कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना सकाळी प्रात्यक्षिके व दुपारी कॉलेज,माध्यमिक शिक्षकांना विविध शैक्षणिक कामे स्टुडंट पोर्टल, यु-डायस, परीक्षा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, आर. एस. पी. अशी कितीतरी विभाग सांभाळून विद्यार्थ्यांना सर्व गुणसंपन्न करण्याचा प्रयत्न शिक्षक करत असताना अकोले तहसील कार्यालयाने शिक्षकांना (बी.एल.ओ.) ची कामे दिली आहे, त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होईल अशा विविध अडचणी समजावून घ्याव्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांना प्राध्यापकांना बी.एल.ओ.ची कामे देऊ नये असे म्हणणे निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष भेटून शिक्षक भारती संघटना अहमदनगरचे सरचिटणीस महेश पाडेकर यांनी निवासी नायब तहसीलदार श्री. ठकाजी महाले यांना दिले.
याप्रसंगी माध्यमिक विभागाचे तालुकाध्यक्ष संजय पवार यांनी आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्हाला देखील प्राथमिक शिक्षकांप्रमाणे न्यायालयात जावे लागेल असे प्रतिपादन केले तसेच विद्यार्थ्यांची शैक्षणिक नुकसान होऊ नये इयत्ता १०वी १२वीच्या विद्यार्थ्यांना विशेष तयारीसाठी शिक्षकांना रविवारी देखील जादा तास घ्यावे लागतात असे उच्चमाध्यमिक विभागाचे तालुकाध्यक्ष संपत वाळके यांनी सांगितले.
याप्रसंगी संपर्क प्रमुख सुरज गायकवाड, अमोल तळेकर,पांडे विजय, पवार बाळू, निशांत बिबवे, विनोद नवले, विजय उगले, पोपट सदगीर आदी उपस्थित होते. आमदार कपिल पाटील यांनी दिले या मागणीला राज्यअध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे,कार्यवाह जालिंदर सरोदे, कोकण विभागाचे अध्यक्ष धनाजी पाटील, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष आर.बी.पाटील, राज्य सचिव सुनील गाडगे,जिल्हाध्यक्ष रामराव काळे, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप ,उपाध्यक्ष सचिन जासूद, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, महिला राज्याध्यक्ष रूपाली कुरुमकर, अमोल चंदनशिवे, गोवर्धन रोडे, माफीज इनामदार, योगेश देशमुख, चंद्रशेखर हासे, संजय भालेराव, गणपत धुमाळ, कैलास रहाणे, सुशांत सातपुते, रूपाली बोरुडे, उषा मिसाळ, सचिन लगड, श्याम जगताप, संजय तमनर,चंद्रशेखर हासे, प्रवीण मते,दादासाहेब कदम, संतोष निमसे, मारुती कुसमुडे ,मनोहर राठोड, प्रवीण आहेर,सोमनाथ खाडे अमोल वरपे, हर्षल खंडीझोड, संदीप तोगे, बाबासाहेब चौधरी, जालिंदर पटारे, बबन भोसले, नानासाहेब खराडे, हरिश्चंद्र पंडित, नितीन शिरसाट आदी पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला.
Web Title: Ahmednagar Teachers should not be given BLO tasks
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App