मोठी बातमी! राज्यातील या दोन जिल्ह्यांच्या नावाला केंद्रसरकारची मंजुरी
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली.
मुंबई: गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद आणि उस्मानाबादची नावे बदलण्याचा निर्णयावरुन चर्चा सुरू होत्या. या चर्चेवर आज अखेर केंद्र सरकारने मोठा निर्णय दिला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. महाविकास आघाडी सरकारने शेवटच्या बैठकीत या दोन शहरांच्या नामांतराला मंजुरी दिली होती. यानंतर या नामांतराच्या मंजुरीसाठी हे प्रकरण केंद्र सरकारकडे गेली होते. आता या संदर्भात केंद्र सरकारने निर्णय दिला आहे.
याबाबत आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी मिळाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करुन दिली.
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’,
उस्मानाबादचे ‘धाराशिव’ !
राज्य सरकारच्या निर्णयाला केंद्र सरकारची मंजुरी !
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री मा. अमितभाई शाह यांचे कोटी-कोटी आभार!
मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या नेतृत्त्वातील सरकारने ‘करुन दाखविले’…!
Web Title: Central government approved the name of these two districts in the state
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App