Home संगमनेर संगमनेर: देवगड येथील खंडोबा देवस्थानची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न मात्र…..

संगमनेर: देवगड येथील खंडोबा देवस्थानची दानपेटी फोडण्याचा प्रयत्न मात्र…..

Sangamner Theft: खंडोबा देवस्थानची असणारी दानपेटी  अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला. 

Attempt to theft the donation box belonging to Khandoba temple

संगमनेर: संगमनेर तालुक्यातील हिवरगांव पावसा येथील देवगड येथील खंडोबा देवस्थानची असणारी दानपेटी  अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तो असफल ठरला. सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली असून  दानपेटी फोडण्याचा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे प्रतिजेजुरी देवगड हे खंडोबा महाराजांचे देवस्थान आहे. १५ दिवसापूर्वी याठिकाणी खंडोबाची मोठी यात्रा भरली होती. त्यामुळे संधी साधून चोरट्यांनी दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला परंतु प्रयत्न असफल झाला. 

याबाबत अधिक माहिती अशी की, हिवरगाव पावसा येथल देवगढ देवस्थानच्या मंदिराच्या गाभाऱ्याजवळ मोठी दानपेटी बसविलेली आहे. अज्ञात दोन चोरट्यांनी मंदिरात प्रवेश करून पहारीच्या साह्याने दानपेटी फोडण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना ती दानपेटी फोडण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मंगळवारी सकाळी खंडोबा देवस्थान पुजारी बबन बाबुराव शिंदे हे देवपूजा करण्यासाठी मंदिरात गेले असता त्यांना त्यांना ही बाब लक्षात आली असता त्यांनी ही बाब तात्काळ देवस्थान ट्रस्टचे सचिव अध्यक्ष व सर्व विश्वस्तांना दिली. यावेळी सर्वांनी येऊन मंदिरात पाहणी केली असता दानपेटी फुटल्याचे आढळून आले. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Attempt to theft the donation box belonging to Khandoba temple

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here