संजय राउतांच्या अडचणी पुन्हा वाढणार का? त्यांच्यावर दोन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Sanjay Raut Crime Filed: संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकपाठोपाठ आता ठाण्यातही गुन्हा दाखल.
Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकपाठोपाठ आता ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह हे शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. या निर्णयानंतर ठाकरे गटाला जोरदार धक्का बसला आहे.
दरम्यान, यावरून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद शिगेला पोहोचला आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. या प्रकरणी शिवसैनिक आक्रमक झाले असून राऊत यांच्याविरोधात नाशिकपाठोपाठ ठाण्यामध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रविवारी पुणे दौऱ्यावर आले होते. यावेळी शहा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली होती. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तळवे चाटायला गेले. पण निवडणूक आयोगाने दूध का दूध. पानी का पानी केले, असं विधान अमित शाह यांनी केलं होतं. शाह यांचं हे विधान ठाकरे गटाच्या जिव्हारी लागलं आणि वाद सुरू झाला होता.
दरम्यान, शहा यांच्या विधानानंतर पलटवार करताना राऊत यांची जीभ घसरली. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आक्षेपार्ह विधान केलं. हे लोक काय चाटत आहेत. ही चाटूगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटूगिरीचं ढोंग आहे. टोकाची चाटूगिरी सुरू आहे. ज्यांची चाटली जातेय ते आम्हाला न्याय देत आहेत, अशी टीका राऊत यांनी केली होती.
नाशिकचे शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कलम 500 नुसार संजय राऊत यांच्या विरोधात बदनामी केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत चाटूगिरी शब्द वापरल्याने त्यांची बदनामी झाल्याच तक्रारीत नमूद केले आहे.
Web Title: Sanjay Raut Crime Filed in Nashik and Thane
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App