संगमनेरमध्ये कारमधून गोमांस वाहतूक, ५०० किलो गोमांस पकडले
Sangamner Crime: रायतेवाडी फाटा या ठिकाणी शहर पोलिसांनी कारमधून विक्रीसाठी नेत असलेले 500 किलो गोमांस पोलिसांनी जप्त (seized) केले.
संगमनेर: रायतेवाडी फाटा या ठिकाणी शहर पोलिसांनी कारमधून विक्रीसाठी नेत असलेले 500 किलो गोमांस पोलिसांनी जप्त केले. संगमनेर शहर पोलिसांनी नाकाबंदी करून 500 किलो गोमांस पोलिसांनी पकडले. याप्रकरणी संगमनेर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी चारचाकीसह सुमारे साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मात्र अंधाराचा फायदा घेत कार चालक पसार झाला.
पोलिसांनी गोवंश जनावरांच्या गोमांस, कारसह साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याबाबत संगमनेर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जनावराच्या कत्तलीस बंदी असताना देखील या आदेशाचे उल्लंघन करून नाशिक पुणे महामार्गावर गोमांसची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रायतेवाडी फाटा या ठिकाणी नाकाबंदी केली. वाहनांची तपासणी करीत असताना एका कारमध्ये पोलिसांना गोमांस आढळले. पोलिसांनी कारमधून 500 किलो व मांस जप्त केले. याबाबत पोलिस कॉन्स्टेबल अमृत आढाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमा विरोधात गोहत्याबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
Web Title: Traffic of beef by car in Sangamner, 500 kg of beef seized
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App