Home अहमदनगर धक्कादायक घटना: चप्पल घ्यायचा हट्ट न पुरविल्यामुळे, मुलानं चक्क आपले आयुष्यच संपवले

धक्कादायक घटना: चप्पल घ्यायचा हट्ट न पुरविल्यामुळे, मुलानं चक्क आपले आयुष्यच संपवले

Suicide News: एका मुलानं चक्क आपले आयुष्यच संपवले आहे कारणंही शुल्लक असलं तरी आत्महत्या करेपर्यंत एकाची मजल.

Due to his insistence on getting the slippers, the boy Suicide

बीड: प्रत्येकासोबत कधी काय घडेल याचाही काहीच थांगपत्ता नसतो. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामुळे एका मुलानं चक्क आपले आयुष्यच संपवले आहे कारणंही कितीही शुल्लक असलं तरी आत्महत्या करेपर्यंत एकाची मजल गेली आहे. ही घटना बीड जिल्ह्यातील हिंगणी या गावातील आहे. त्यामुळे या घटनेनं सगळीकडेच खळबळ उडाली आहे. एका लहान मुलानं नवीन चप्पल घ्यायचा हट्ट आपल्या आजी-आजोबांकडे केला. त्यांनी त्याचा हट्ट पुरवला नाही म्हणून आपल्या नातवाचा मृतदेह पाहावा लागला आहे. या घटनेनं त्यांच्या कुटुंबियांना जबर मानसिक धक्का बसला आहे.

आजोबांनी आपल्या नातवाला नवी चप्पल घेऊन दिली नाही म्हणून त्यामुळे आलेल्या रागापायी नातवानं चक्क आत्महत्या केली आहे. मृत मुलाचे आईवडील हे उसतोड कामगार आहेत. त्यांनी त्यांच्या मुलाला आजोबांकडे राहायला पाठविले होते. त्याचे आजोबा हे बोडखा कासारीचे रहिवासी असून त्यांची पत्नी म्हणजे लहान मुलाच्या आजीकडे नवी चप्पल घेण्याचा आग्रह केला होता. आता नवी चप्पल तुला घेऊन देणार नाही आम्ही नंतर घेऊ, असं म्हणत त्याच्या आजी-आजोबांनी त्याची समजूत काढली, परंतु तो खूपच जास्त हट्ट करू लागला होता.

त्यांच्या आजी-आजोबांनी मात्र त्याला चप्पल घेऊन न दिल्यानं तो निराश झाला होता. मी माझ्या आईबाबांकडे परत जातो असं तो म्हणू लागला होता. त्यात तो घराबाहेर पडलाही, त्यानं बाहेर जाऊन कुठेतरी गळफास घेऊन आत्महत्याही केली. दिंद्रूड पोलिसांनी घटनास्थळी पोहचत पंचनामा केला आहे. आपल्या नातवाचा मृतदेह हाती आल्यानंतर त्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे.

Web Title: Due to his insistence on getting the slippers, the boy Suicide

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here