Home अकोले कोतूळ येथे देशी दारूचे दुकान, धाब्यात चोरी, दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला.

कोतूळ येथे देशी दारूचे दुकान, धाब्यात चोरी, दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला.

कोतूळ : येथील कोतूळ-अकोले रस्त्याच्या कडेला असलेले शिवाजी तुकाराम देशमुख यांचे देशी दारू दुकान व डाक बंगल्याच्या शेजारी असलेला गणेश सुधाकर देशमुख यांचे हॉटेल सातबारा सोमवारी रात्री चोरट्यांनी फोडले, तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भरत देशमाने यांची दुचाकी व कपडे चोरून नेले. मात्र, दुचाकीची मोडतोड करून ती कोतूळ पुलाजवळ टाकून दिली.

अनेक दिवसांपासून थांबलेले चोरी सत्र कोतूळात पुन्हा सुरू झाले. कोतूळ येथील शिवाजी तुकाराम देशमुख यांचे परवानाधारक देशी दारू दुकान चोरट्यांनी सोमवारी रात्री दुकानाचे पत्रे उचकून आतील नमुना देशी दारू बाटल्या, सीसीटीव्ही ्क्रिरन तसेच सीसीटीव्ही कॅमेरा चोरून नेला. चोरट्यांनी मोर्चा समोरील हॉटेल सातबाराकडे वळवून दरवाजा तोडून आतमध्ये पिठले, दाळ व चायनिज, रोट्या बनवून जेवण केले. तेथून जवळच असलेल्या कृषी भरत देशमाने यांची दुचाकी व कपडे चोरून नेले. काही अंतरावर गाडी लोटत गेल्यानंतर चालू न झाल्याने मोडतोड केली.

कोतूळमध्ये गेल्या दहा वर्षांत अनेक छोट्या-मोठ्या चोऱ्या झाल्या. मात्र, एकही चोरीचा तपास अद्याप लागला नाही. अकोले पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, सहाय्यक निरीक्षक सुनील साळवे यांनी पंचनामा केला असून चोरट्यांना लवकर पकडण्यात येईल, असे पोलीस प्रशासनाने सांगितले.

Website Title: Attempts To Steal A Local Liquor Store, Robbery, Two-Wheeler At The Latest News Kotol.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here