Home महाराष्ट्र मजनू धडकला युवतीच्या भावी सासरी, सून केल्यास आत्महत्येची धमकी

मजनू धडकला युवतीच्या भावी सासरी, सून केल्यास आत्महत्येची धमकी

लग्न करून तिला सून म्हणून तुम्ही घरात आणाल, तर मी जीवाचे बरेवाईट करेन, अशी धमकी चक्क तिच्या होणाऱ्या सासूबाईला.

threatened the girl's future father-in-law, and daughter-in-law with suicide

अमरावती: एकतर्फी प्रेमातून कोण काय करेल, कुणाला धमकी देईल, कुठे पोहोचेल सांगता येत नाही. असाच एक एकतर्फी प्रेम असलेला मजनू चक्क प्रेयसीच्या नियोजित सासरी पोहोचला. लग्न करून तिला सून म्हणून तुम्ही घरात आणाल, तर मी जीवाचे बरेवाईट करेन, अशी धमकी चक्क तिच्या होणाऱ्या सासूबाईला दिली. अखेर त्याचे ते एकतर्फी प्रेम त्याला पोलिस ठाण्यातच घेऊन गेले.

याप्रकरणी पोलिसांनी ९ फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास विशाल यादव (रा. गोपालनगर) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, विशाल यादव व तरुणी परस्परांच्या परिचयातील आहेत. तो संबंधित तरुणीचा घरापर्यंत पाठलाग करायचा. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. दरम्यान, एक दिवस ती बाब तरुणीच्या लक्षात आली. सामाजिक बदनामी टाळण्यासाठी तिने त्याला पाठलाग का करतो, अशी विचारणा केली. त्यावर माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तूच हवी आहेस, मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे, असे काहीबाही तो बडबडला. त्यावर तिने त्याला ठामपणे नकार दिला. ते समजून न घेता त्याने एकतर्फी प्रेमातून त्याचे चाळे सुरूच ठेवले.

■ तरुणीचे लग्न जुळल्याची बाब विशालच्या कानावर गेली. त्यामुळे तो बुधवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास तरुणीच्या नियोजित सासरी पोहोचला. तेथे धिंगाणा घातला.

■ तिचे लग्न झाले, तिला सून म्हणून तुम्ही घरी आणले, तर मी तेव्हाच आत्महत्या करेन, अशी धमकी दिली. ही बाब होणाया सासूने तरुणीला फोन करून सांगितली.

■ या घटनेने दोन्ही कुटुंब मात्र विचलित झाले. अखेर तरुणीनेच मनाचा हिय्या करत बुधवारी रात्री पोलिस ठाणे गाठले.

Web Title: threatened the girl’s future father-in-law, and daughter-in-law with suicide

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here