Home कोल्हापूर डोक्यात अनैतिक संबंधाचे भूत, बायकोला गोड बोलून फिरायला घेऊन गेला आणि डोक्यात...

डोक्यात अनैतिक संबंधाचे भूत, बायकोला गोड बोलून फिरायला घेऊन गेला आणि डोक्यात घातला दगड

Kolhapur Murder Case: अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीला गोड बोलून फिरायला नेऊन डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना.

Suspected of having an immoral relationship, the husband murder his wife

कोल्हापूर: कोल्हापुरात अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीला गोड बोलून फिरायला नेऊन डोक्यात दगड घालून निर्घृण खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.स्नेहल नितीन ऐवळे (रा. खडकी ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) असे मयत महिलेचे नाव असून ती ऊसतोड मजूर होती. खून केल्यानंतर नराधम पती नितीन ऐवळे हा स्वत:हून करवीर पोलिस ठाण्यात हजर झाला आणि खुनाची कबुली दिली. पती ऊसतोड मजूर असून तो सोलापूर जिल्ह्यातील आहे. खुनाची घटना कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील बालिंगे पूलाच्या पाणंद परिसरात झाली.

याबाबत अधिक माहिती अशी की, नितीन दगडू ऐवळे हा पत्नी स्नेहलसह गुरुदत्त शुगर वर्क्स टाकळीवाडीत ऊस तोडणीचे काम करण्यासाठी आला होता. आपल्या पत्नीचे मोबाईलवरील बोलण्यावरून अनैतिक संबंध असल्याचा संशय नितीनच्या मनामध्ये होता. त्यामुळे त्याने सोमवारी दुपारी मुलांना भेटण्यासाठी पत्नी स्नेहलला घेऊन मध्यवर्ती बसस्थानक परिसरात आला. बसस्थानकात बसची वाट पाहण्याचा बहाणा करत सायंकाळी सहा वाजेपर्यंत वेळ घालविला. बस नसल्याने दोघे चालत फिरत फिरत कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर बालिंगे पुलाजवळ आले. दिवसभर कंटाळा आल्याने शेताच्या बांधावर आराम करण्याचा दोघांनी निर्णय घेतला. आराम करत असतानाच दोघांना झोप लागली. पहाटे पाच वाजता नितीन उठला. त्यावेळी पत्नी स्नेहल गाढ झोपेत होती. त्याने बांधावरील मोठा दगड उचलून त्याने पत्नीच्या डोक्यात घातला. यावेळी स्नेहलच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

खून केल्यानंतर आरोपी नितीन मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पहिल्यांदा लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनमध्ये गेला. त्याने पत्नीचा खून केल्याचे पोलिसांना सांगितले. घटनेचे गांभीर्य ओळखून लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्याला करवीर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले. करवीरचे पोलिस निरीक्षक रवी पाटील यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस निरीक्षक अरविंद काळे यांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक काळे,पोलीस उपनिरीक्षक निवास पवार, विक्रांत चव्हाण, रवी पाटील हे घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Suspected of having an immoral relationship, the husband Murder his wife

Also See: Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here