अहमदनगर: गावठी पिस्तुलासह एकास अटक
Ahmednagar Crime: गावठी पिस्तुल बाळगणाऱ्या युवकास अटक (Arrested), पिस्तुल व ९ जिवंत काडतुसे जप्त.
Nevasa : नेवासे खुर्द येथील औदुंबर चौकात पोलिसांनी मंगळवारी (ता. १७) रात्री अकरा वाजता गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या युवकास अटक (Arrested) केली. त्याच्याकडून गावठी पिस्तुलासह नऊ जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
औदुंबर चौकात राहत असलेल्या लता किशोर कुंभकर्ण यांनी आपला मुलगा सागर हा पत्नी प्रांजल व तीन मुलींना दमदाटी, मारहाण व जिवे मारण्याची धमकी देत असल्याची खबर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिस निरीक्षक विजय करे व पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.
विश्वासात घेऊन आरोपीकडून माहिती मिळाल्यानंतर तिसऱ्या मजल्यावरील झोपण्याच्या खोलीतून गावठी पिस्तूल व काडतुसे जप्त केली. आरोपी सागर कुंभकर्ण यास अटक करण्यात आली आहे. श्याम गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला. अधिक तपास हवालदार तुळशीराम गिते करीत आहेत.
Web Title: Ahmednagar arrested one with a pistol
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App