महाविद्यालयीन युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
Latur Suicide News: १९ वर्षीय युवकाने भाड्याच्या खोलीत आत्महत्या केल्याची घटना.
लातूर: उदगीर शहरातील विकासनगर भागात एक १९ वर्षीय युवक शिक्षणासाठी भाड्याने खोली घेऊन राहत होता. त्याने खोलीत गळफास घेतल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वा. उघडकीस आली. याबाबत उदगीर शहर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या मागील कारण अद्याप समोर आले नाही.
शहर पोलिसांनी सांगितले, तालुक्यातील हेर येथील ज्ञानेश्वर उत्तम कदम (१९) हा उदगीरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो शहरातील विकास नगर भागात भाड्याने खोली घेऊन राहत होता. त्याने गळफास घेतल्याची माहिती शहर पोलिसांना बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मिळाली. त्यावरुन शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीसाठी त्याचा मृतदेह येथील सामान्य रुग्णालयात पाठविले. याबाबत उदगीर शहर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी पुठ्ठेवाड हे करीत आहेत.
Web Title: College youth committed suicide by hanging himself
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App