पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, पतीला ठगविले, लाखो रुपये हडपले
Ahmednagar Crime | Shrirampur: पत्नीने तिचा प्रियकर असलेल्या उत्पादन शुल्कच्या एका अधिकाऱ्यासमवेत कट रचून पतीची पाच लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक न्यायालयाच्या आदेशानंतर दोघांवर गुन्हा दाखल.
श्रीरामपूर : पत्नीने तिचा प्रियकर असलेल्या उत्पादन शुल्कच्या एका अधिकाऱ्यासमवेत कट रचून पतीची पाच लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केली. दोघांचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पतीला ठगविण्यात आले.
याप्रकरणी आदेशानंतर शहर पोलिसांनी प्रियकर व पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. बाबासाहेब कंठाळे याच्यासह महिलेचा समावेश आहे. शहर पोलिस गुन्ह्याचा तपास करत आहेत. फिर्यादीच्या पत्नीने लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे ४३ वर्षीय पतीने फिर्यादीत म्हटले आहे.
शहरातील एका भागात फिर्यादी हा पत्नीसमवेत गेल्या अनेक वर्षांपासून राहत होता. तो चालकाचा व्यवसाय करतो. पत्नीने आपला विश्वास संपादन करत घराची जागा स्वतःच्या नावावर करून घेतली. तेथे बंगला बांधल्यानंतर वरच्या मजल्यांवर भाडेकरूंना राहण्याकरिता खोल्या काढण्यात आल्या. तेथे २०१९ मध्ये उत्पादन शुल्क विभागातील हा अधिकारी भाडेकरू म्हणून राहण्यास आला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
तो रात्री अपरात्री घरी येत. पाणी व जेवणाचे निमित्त करून त्याने पत्नीशी जवळीक सुरू केली. त्यानंतर दोघांचेही घरात येणे-जाणे सुरू झाले. मुलांपासून हा प्रकार लपविण्यात आला. पत्नी व त्या अधिकाऱ्याने मुलांना खाऊपिऊ घालण्याचे, तसेच चित्रपट दाखविण्याचे आमिष दाखविले. मात्र, थोड्या दिवसांनी हा प्रकार आपल्या लक्षात आल्याचे फिर्यादीने सांगितले.
अधिकाऱ्याने पत्नीसमवेतचे काही फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. पत्नीनेदेखील ते पैसे देऊन विषय संपविण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे अधिकारी व पत्नीला मुलांच्या शिक्षणासाठी ठेवलेले पाच लाख रुपये दिले. अधिकाऱ्याच्या सासऱ्याला नगर येथे बोलावून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यात दोघेही कटात सहभागी असून फसवणूक झाल्याचे लक्षात आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
पत्नीला सर्व प्रकाराची माहिती विचारली असता तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर रात्रीतून तिने अडीच लाख रुपयांचे दागिने घेऊन पळ काढला. ती अधिकाऱ्यासमवेत राहत आहे. असे फिर्यादीचे म्हणणे आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Crime wife hatched a conspiracy with her lover, cheated her husband, stole lakhs of rupees
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App