Home अहमदनगर संगमनेर: इंदोरीकर महाराजांच्या सासूचा भाजपमध्ये प्रवेश

संगमनेर: इंदोरीकर महाराजांच्या सासूचा भाजपमध्ये प्रवेश

Sangamner News: महाराज इंदोरीकर  (Indorikar Maharaj) यांच्या सासू व संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या सरपंच शशिकला शिवाजी पवार यांनी दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Mother-in-law of Indorikar Maharaj joins BJP

संगमनेर : समाजप्रबोधकार निवृत्तीनाथ महाराज इंदोरीकर यांच्या सासू व संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या सरपंच शशिकला शिवाजी पवार यांनी दोन दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी हा प्रवेश केला.

गत महिन्यात झालेल्या निवडणुकीमध्ये पवार या लोकांमधून सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली होती. पवार या सरपंचपदी निवडून आल्यानंतर त्या आमच्या गटाच्या आहेत, असा दावा माजी मंत्री बाळासाहेब थोरात व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला होता. गावाच्या विकासासाठी निवडणूक लढविली होती. दोन्ही नेत्यांशी आमचे सलोख्याचे संबंध आहेत, असे सरपंच पवार यांनी स्पष्ट केले होते. दोन्ही नेत्यांनी सहकार्य केल्याचेही त्यांनी सांगितले होते. दोन्ही नेत्यांच्या सहकार्यानेच गावाचा विकास करू, असा पवित्राही त्यांनी घेतला होता.

दरम्यान, निळवंडे हे गाव संगमनेर तालुक्यात येत असल्याने आपण आधी थोरात यांच्या संगमनेर येथील यशोधन बंगल्यावर भेटीसाठी गेलो होतो. मात्र, थोरात हे नागपूर अधिवेशनात होते. त्यांच्या कार्यालयातील सहकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही. गावाच्या विकासासाठी कोणाची तरी भक्कम साथ असणे गरजेचे असल्याने भाजपमध्ये प्रवेश केला, असे पवार यांनी स्पष्ट केले.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सरपंच पवार म्हणाल्या की, अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. मला गट-तट काहीही माहिती नव्हते. मला निवडून द्यावे ही सर्वसामान्य लोकांचीच इच्छा होती.

Web Title: Mother-in-law of Indorikar Maharaj joins BJP

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here