Home अकोले अकोले: वेदांत देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा

अकोले: वेदांत देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे द्यावा

अकोले: तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील वेदांत देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी उंचखडक ग्रामस्थांनी केली आहे. ही मागणी मान्य न झायास १५ ऑगस्ट २०१९ रोजी कोल्हार-घोटी राज्य मार्गावर रास्ता रोको करून उंचखडकच्या मारूती मंदिरात बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा उंचखडक ग्रामस्थ व नातेवाईकांनी दिला आहे.

तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथील वंदांत देशमुख या बालकाची गुप्तधनासाठी निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेला जवळपास ४ वर्षे पूर्ण आलेले आहेत, परंतु अदृापही पोलीस प्रशासन आरोपी विरोधात सक्षम पुरावे गोळा करण्यात अपयशी झालेले आहे. वेगवेगळ्या एकूण १६ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास केला परंतु प्रवीणकुमार लोखंडे यांचे व्यतिरिक्त कोणत्याही अधिकाऱ्यास पूर्णवेळ काम करू दिले गेले नाही.

गावकऱ्यांनी मुख्यमंत्री, जष्टे समाजसेवक अण्णा हजारे, ना. राधाकृष्ण विखे पाटील, आ. वैभव पिचड, खा. सदाशिव राव लोखंडे, जिल्हाधिकारी व तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमूख सौरभ त्रिपाठी यांना निवेदन देऊन हा तपास सीबीआयकडे द्यावा अशी मागणी केली होती, परंतू मागणी मान्य करून देखील योग्य तपास लागला नाही त्यामुळे तपासातील दिरंगाई पहाता नातेवाईक व ग्रामस्थांनी १५ ऑगस्ट २०१९ पासुन कोल्हार घोटी राज्यमार्गावर रास्ता रोको करून उंचखडक येथील मारूती मंदिरामध्ये बेमुदत उपोषणास बसणार आहेत असा इशारा देण्यात आला आहे.

Website Title: Latest News Akole: Investigation Of The Murder Case Of Vedant Deshmukh: CBI

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here