अहमदनगर: जीममध्ये तरुणीवर अत्याचार करणारा आरोपी जेरबंद
Ahmednagar | Shrirampur: श्रीरामपुरातील फरार जीम चालक अटकेत (Arrested), अत्याचारातील (abused) फरार आरोपी, न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी.
श्रीरामपूर : तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर जीममध्ये अत्याचार करणाऱ्या फरार आरोपीला शहर पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. त्याला गुरुवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपी व जीम चालक युवराज विजय शिंदे याला खडकवासला येथून पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच शिंदे हे फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते,
शहरातील मुख्य रस्त्यावर शिंदे याची आहे. तेथे नियमित येणाऱ्या एका तरुणीशी त्याची ओळख झाली. त्यानंतर युवराज याने आपल्याशी जवळीक साधली. त्याच्या मालकीच्या जीममध्ये तसेच पुणे येथे हॉटेलमध्ये नेऊन दोन वर्षे अत्याचार केल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे. आरोपी शिंदे याने आपल्याला लग्नाचे आमिष दाखविले. मात्र त्यानंतर त्याने लग्नास टाळाटाळ केली. एका मंदिरामध्ये मंगळसूत्र घालत खोटा विवाह केला. शिंदे हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याने जिवे मारण्याची धमकी दिली तसेच मारहाण केली, असे पीडितेचे म्हणणे आहे.
पीडितेने यानंतर बेलापूर येथील प्रवरा नदीवरील पुलावरून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यात ती बचावली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर दहा दिवस होऊनही आरोपी मिळून येत नव्हता. तो खडकवासला येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळताच तेथे पथक रवाना झाले होते. त्यांनी मोठ्या शिताफीने आरोपीला ताब्यात घेतले. पथकामध्ये सहायक पोलिस निरीक्षक जीवन बोरसे, हवालदार राहुल नरवडे, गौतम लगड, रमीजराजा अत्तार, गणेश गावडे, फुरकान शेख, प्रमोद जाधव यांचा समावेश होता.
जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation. भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC. सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.
Web Title: Accused who abused young woman in gym jailed
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App