धक्कादायक! कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून विवाहित महिलेवर बलात्कार
Rape Case: व्यवसायात भागीदार बनविण्याचे आमिष दाखवून कॉफीमधून गुंगीचे औषध टाकून बेशुद्ध करीत विवाहित महिलेवर बलात्कार केल्याची घटना पुणे येथे घडली. आरोपीस अटक.
पुणे : महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचारांच्या घटना वाढतच आहे. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात एका विवाहित महिलेवर बलात्कार (Rape) केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने व्यवसायात भागीदारी देण्याचं अमिष दाखवून महिलेला घरी बोलावून घेतलं. त्यानंतर कॉफीमधून गुंगीचं औधष देत महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अजयसिंग विजयसिंग ठाकूर (वय ३१ वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुण्यातील खराडी परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपीची कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन मध्ये नोकरी गेली होती. सऱ्या नोकरीच्या शोधात असताना त्याची एका मित्रमार्फत तक्रारदार महिलेशी ओळख झाली.
फिर्यादी महिला केटरींगच्या व्यवसायात असल्यामुळे दोघांनीही हॉटेल सुरू करण्याचे ठरवले. दरम्यान यासंबंधी चर्चा करण्यासाठीच आरोपीने फिर्यादी महिलेला खराडी भागात घरी बोलावले होते. घरी आल्यानंतर आरोपीने महिला कॉफी मध्ये गुंगीचे औषध दिले. महिला बेशुद्ध पडल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला.
दरम्यान, महिलेला शुद्ध आली तेव्हा तिच्या अंगावर कपडे नव्हते. आपल्यावर बलात्कार झाल्याचं लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून चंदनगर पोलिसांनी आरोपी अजयसिंग विजयसिंग ठाकूर याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation. भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC. सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.
Web Title: Rape of married woman by putting gungy drug in coffee
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App