अहमदनगर: तरुणासोबत हनीट्रॅप, महिलेने तिचे अंगावरचे कपडे फाडले अन तरुणाने केले असे काही
Ahmednagar HoneyTrap: तरुणाला हनीट्रॅपमध्ये अडकवायला गेली, अन ‘ती’ स्वत:च फसली नगरमधील प्रकार: एक लाखांची मागणी, महिलेला अटक.
अहमदनगर: तरुणाला घरी बोलावून घेतल्यानंतर तिच्या साथीदारांनी हळूच दरवाजा बंद केला. बंद दरवाजाआड महिलेने स्वतःचे, तसेच मुलीचे कपडे काढत एक लाख रुपये दे नाही तर तुझ्यावर अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करीन, अशी धमकीच एका २९ वर्षीय महिलेने तरुणाला दिली. मात्र, चतुर तरुणाने सुटका करून घेत थेट पोलिस ठाणे गाठले. त्यामुळे महिलेचा डाव तिच्यावरच उलटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही घटना मंगळवारी (दि.२०) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नगरमध्ये घडली.
याप्रकरणी तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून महिलेविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तरुणाने सदर महिलेला फोन केला होता. त्यांचे फोनवरून बोलणे झाले. माझे घर जवळच आहे. तू घरी ये, असे ती त्याला म्हणाली. त्यानुसार तरुण मंगळवारी (दि.२०) सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तिच्या घरी गेला. त्यावेळी तिथे तिची मुलगीही होती. महिलेशी बोलत असताना तिथे आणखी दोन अनोळखी व्यक्ती आले. त्या दोघांनी घराचा दरवाजा बंद केला व तू इथे का आलास. तू पैसे दे नाही तर तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. त्यानंतर महिलेनेही तू एक लाख रुपये दे. मी हे प्रकरण मिटवते. नाही तर तुझ्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करते, अशी धमकी दिली. त्यावर माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, असे तरुणाने तिला सांगितले. त्यानंतर महिलेने ८० हजारांची मागणी केली.
तरुणाने माझ्याकडे तेवढे नाहीत, असे सांगितल्यानंतर तुला २५ हजार रुपये तर द्यावेच लागतील, असे म्हणत महिलेने तिचे व तिच्या मुलीचे कपडे फाडले व तरुणाला गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. दरम्यान, तरुणाने कसाबसा घराचा दरवाजा उघडत धूम ठोकली. त्याने ही माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर महिलेला ताब्यात घेतले असून, तिला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर भादवि कलम ३८९, ५०४ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धूम ठोकल्याने तरुण बचावला
महिलेने पैशांची मागणी करत स्वतः कपडे फाडून घेतले. हे लक्षात आल्यानंतर तरुणाने घराचा दरवाजा उघडून धूम ठोकली. त्यामुळे महिलेचा डाव फसला असून, तिच्यासह आणखी दोन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जाहिरात: आपल्या स्वप्नातील घर घ्या, भाडे भरण्यापेक्षा हप्ता भरा आणि स्वतःच्या घराचे मालक व्हा!!! तसेच इतर तारण कर्जासाठी संपर्क करा.- SRM-India Shelter Finance Corporation. भागीरथ पानसरे मोबा. 8975489830/7414971196 👉Home loan 👉LAP 👉purchase + Construction ETC. सिबिल प्रॉब्लेम असेल तरी संपर्क करा.
Web Title: Honeytrap with young man, woman tore off her clothes
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App