विजेचा धक्का लागल्यामुळे एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू
एकाच शेतकरी कुटुंबातील 4 जणांचा विजेचा धक्का (electric Shock) लागून मृत्यू झाल्याची घटना. नदीपात्रात पाण्याची मोटार ढकलत असताना घडला हा अपघात.
पुणे: नदीपात्रात पाण्याची मोटार ढकलत असताना विजेचा धक्का लागल्यामुळे एकाच शेतकरी कुटुंबातील 4 जणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. यामध्ये वडील आणि मुलाचाही समावेश आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, , पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापुरजवळ निगडे धांगवडी येथे गुंजवणी नीरा नदीपात्रात ही घटना घडली आहे. पाण्यात मोटार ढकलत असताना अचानक गेलेली वीज परत आली आणि पाण्यात वीजप्रवाह उतरल्यामुळे एकाच कुटुंबातील चौघांना विजेचा जबर धक्का बसला, त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये बापलेकांचा समावेश आहे.
Earn Money Online | सोशियल मेडिया मनोरंजनासोबत पैसे कमविण्याचा फंडा | जाणून घ्या
विठ्ठल सुदाम मालुसरे, सनी विठ्ठल मालुसरे, अमोल चंद्रकांत मालुसरे, आनंदा ज्ञानोबा जाधव (सर्व रा. निगडे ता.भोर जि.पुणे) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच वीज मंडळ व पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
Web Title: Four members of the same family died due to an electric shock
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App