Home अहमदनगर पोलिस अधीक्षक कार्यालयात महिलेचा अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

पोलिस अधीक्षक कार्यालयात महिलेचा अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

Ahmednagar Crime : मुलीचा लागेना शोध, आईने उचलले टोकाचे पाऊल पोलिस अधीक्षक कार्यालयातील घटना : डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न (self-immolation).

woman attempted self-immolation by pouring diesel on her body in the office of the Superintendent

अहमदनगर: येथील जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात एका महिलेने अंगार डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी धाव घेत महिलेला ताब्यात घेतले. ही घटना सोमवारी (दि.१२) दुपारच्या सुमारास घडली. घरातून पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीचा तपास लागत नसल्याने महिलेने हे पाऊल उचलले असल्याचे समोर आले असून, याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रारांची वर्दळ असते. इमारतीच्या स्वागत कक्षा समोरच स्वतंत्र तक्रार कक्ष आहे. सदर महिला पतीसोबत तक्रार देण्यासाठी सोमवारी दुपारी पोलिस अधीक्षक कार्यालयात आली होती. पती तक्रार नोंदविण्यासाठी तक्रार कक्षाकडे गेले आलेली आहे. असताना पत्नीने सोबत आणलेली डिझेलची बाटली काढली व डिझेल अंगावर ओतून घेतले.

हा प्रकार स्वागत कक्षाबाहेर नियुक्तीस असलेल्या पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी धाव घेत महिलेला ताब्यात घेत डिझेलची बाटली काढून घेतली. पोलिसांनी अधिक माहिती घेतली असता सदर महिलेची अल्पवयीन मुलगी गेल्या सप्टेंबरमध्ये पळून गेली आहे. याबाबत नगर तालुका पोलिस ठाणे तालुका गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिस ठाण्यात तीन महिन्यांपासून सदर महिला व तिचे पती पोलिसांकडे पाठपुरवा करत होते. मात्र मुलीचा शोध लागत नसल्याने महिलेने आत्मदहनाचे पाऊल उचलले, अशी माहिती समोर आली आहे.

Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी

याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात १७ वर्षीय मुलगी पळून गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर मुलीचा शोध सुरु असून, राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांना माहिती देण्यात आलेली आहे. सर्व बाजूंनी मुलीचा तपास सुरू असून, संशयित चार जणांना अटक करण्यात आलेली आहे.

-राजेंद्र सानप, सहायक पोलिस निरीक्षक,

Web Title: woman attempted self-immolation by pouring diesel on her body in the office of the Superintendent

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here