संगमनेर: अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा खून, नाल्यात आढळला मृतदेह
Sangamner murder: इंजिनिअरचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याचा अज्ञात इसमांनी खून करुन त्याला नाल्यात फेकून दिले असल्याचे आढळून आल्याने शहरात एकच खळबळ.
संगमनेर: संगमनेर शहरातील सुकेवाडी परिसरातील नाटकी नाल्यात आज शुक्रवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास एका अनोळखी तरुणाचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला होता. त्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात महिती दिली. पोलिसांनी संबंधित तरुणाची ओळख पटण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करुन सर्वत्र मृतदेहाचे फोटा व्हायरल केले. त्यानंतर सदर मयत तरुणाच्या मित्राने हा फोटो ओळखला आणि या मयत तरुणाची ओळख पटली.
संकेत सुरेश नवले (वय 22रा. नवलेवाडी ता. अकोले) असे या तरुणाचे नाव असल्याचे समोर आले. दरम्यान तो इंजिनिअरचे शिक्षण घेण्यासाठी संगमनेरला आला होता आणि आज त्याचा अज्ञात इसमांनी खून करुन त्याला नाल्यात फेकून दिले असल्याचे आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली. याबाबत माहिती अशी की, संकेत सुरेश नवले हा अमृतवाहीनी अभियांत्रिकी महाविद्यालयात इंजिनिअरींगचे शिक्षण घेण्यासाठी संगमनेरला आला होता. तो आमृतवाहीनी कॉलेजच्या काही मित्रांच्या समवेत रुम किरायाने घेऊन राहत होता. शिक्षण असताना काल गुरुवारी त्याचे कोणासोबत तरी वाद झाले.त्यातूनच अज्ञात मारेकऱ्यांनी संकेत सुरेश नवले याच्या डोक्यात काहीतरी तीक्ष्ण हत्याराने जोरदार वार केले. त्यात तो जखमी झाला मात्र मारेकऱ्यांनी त्याला नाटकी नाल्यातच टाकून देत पळ काढला.
दरम्यान सकाळी या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरीकांना संबंधित तरुणाचा मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ शहर पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर मृतदेह ताब्यात घेऊन प्रथमत अकस्मात मृत्युची नोंद केली. मात्र, तरुणाच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार झालेले आढळून आल्याने त्याची ओळख पटणे महत्वाचे होते. पोलिसांनी तरुणाच्या मृतदेहाच्या फोटोसह मेसेज व्हाटसऍप, फेसबु सोशल मीडियावर प्रकाशित केला.
दरम्यान सदर मेसेज अनेक गृपवर फिरल्यानतर तो इंजिनिअरींगच्या मुलांच्या ग्रुपवरही गेला. त्यानंतर या तरुणाच्या मित्रांनी पोलिसांशी संपर्क केला आणि हा तरुण संकेत सुरेश नवले (रा. नवलेवाडी, ता. अकोले) येथील असून तो अमृतवाहीनी अभियांत्रिकी कॉलेजमध्ये संगणक विभागात तृतीय वर्षाचे शिक्षण घेत असल्याचे समोर आले. तसेच तो याच कॉलेज समोर राहतो अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी सुरु केली. त्यानंतर काही धागेदोरे हाती लागतात का याचा तपास सुरु केला. दरम्यान संकेत हा काल मित्रांसोबत वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये गेला होता. त्यानंतर तो रुमवर परत आलाच नाही तसेच त्याचा मोबाईलही बंद आला अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे पोलिसांनी त्याच्या पालकांशी संपर्क साधला व शवविच्छेदना नंतर मृतदेह पालकांच्या ताब्यात देण्यात आला.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
दरम्यान संगमनेरात याच परिसरात दोन दिवसांपुर्वी एका तरुणाचा मृतदेह अढळून आला होता. त्यात पुन्हा या तरुणाचा खून केलेला मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी शहर पोलीस कसोशीने प्रयत्न करत आहे.
Web Title: Amritvahini Engineering College student murder, body found in drain
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App