शिर्डीत राष्ट्रवादीचे कार्यालय जळून खाक- Burnt
Shirdi Burnt: सिलिंडरला इजा न पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली.
शिर्डी: साईनगरीत आज शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत राष्ट्रवादीचे कार्यालय जळून खाक झाले. राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे जनसंपर्क कार्यालय होते. या विभागाचे येथील अध्यक्ष राहुल शामराव कुलकर्णी यांचे हे कार्यालय असल्याचे पदाधिकारी आनंद गायकवाड यांनी सांगितले.
दुपारी लागलेल्या आगीत कार्यालयातील कागदपत्रे, कार्ड, टेबल, खुर्च्या, सोफासेट यासह सगळ्या चीजवस्तू जळून खाक झाल्या. नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाने वेळीच धाव घेऊन आगीचा अन्यत्र होणारा फैलाव नियंत्रणात आणला.
Earn Money Online | स्मार्टफोनचा वापर करून ऑनलाईन कमाई | लाईफटाईम इनकम
येथे लगतच असलेल्या एका दुकानात गॅस सिलिंडर होते. मात्र, सिलिंडरला इजा न पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे सांगण्यात येते.
Web Title: NCP office burnt down in Shirdi
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App