मालवाहू ट्रक व मोटारसायकलची धडक होऊन अपघात, एक ठार
Ahmednagar Accident: रस्त्यावर उभा असलेला मालवाहू ट्रक व मोटारसायकलची धडक होऊन अपघात, एक ठार, एक जखमी.
राहुरी: राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड शिवारात शनिशिंगणापूर रस्त्यावर उभा असलेला मालवाहू ट्रक व मोटारसायकलची धडक होऊन अपघात झाला. यात एक ठार तर एक जखमी झाला आहे.
काल (बुधवारी) रात्रीच्या सुमारास राहुरी तालुक्यातील काळे आखाडा व रासने वस्ती येथील दोन तरूण मोटारसायकलवर राहुरीच्या दिशेने जात असताना पिंप्री अवघड येथील एका रसवंती सेंटरच्या जवळ दोन दिवसांपासून नादुरूस्त रस्त्यावर उभ्या मालवाहू ट्रकला पाठीमागून आदळल्याने मोठा अपघात झाला आहे.
यात तुषार शंकर काळे (वय 26) हा घटनास्थळीच मृत झाल्याचे समजते. तर बेल्हेकर नामक तरूण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नगर येथे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Web Title: truck and motorcycle collide in an accident, one killed
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App