अहमदनगर जिल्ह्यात थंडीची लाट, हूड हुडी भरली, कमाल तापमान…..
Whether Alert: राज्यात पुढील चार दिवस थंडीचे असणार, काही भागांत थंडीची लाट असणार, नगरकरांची चिंता वाढली.
अहमदनगर: नगर जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागात हुडहुडी भरली असून काही भागात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. यामुळे नगरकरांची चिंता वाढली आहे.
राज्यात पुढील चार दिवस थंडीचे असणार आहे. हवामानातील कोरडेपणा वाढला असून रात्रीचे तापमान मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. यामुळे गारठा वाढणार आहे. ही स्थिती चार दिवस राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली होती. तो अंदाज खरा ठरला आहे. दोन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात हुडहुडी भरली आहे. नगर जिल्ह्यातही तीच स्थिती आहे. काल रविवार कमाल तापमानाची नोंद 11 अंश सेल्सिअस नोंदवली गेली आहे. थंडीचा पारा खाली आल्याने रात्रीच्या वेळी शेकोट्या पेटविल्याचे चित्र दिसत आहे.सकाळी कान टोपी व स्वेटर असे उबदार कपडे घालून नागरिक बाहेर पडताना दिसत आहेत.
दररोज करू शकता १ हजार ते १५ हजार रुपयांची कमाई ते ही घरबसल्या ऑनलाईन | Earn Money Online
या वाढत्या थंडीचा गहू, हरबरा व अन्य पिकांना लाभ होणार असलातरी द्राक्ष उत्पादक चितेत सापडली आहे. नाशिकमध्ये 9.8, पुणे 9.7, धुळे 7.1, निफाड 7.8, जळगाव 8.5 सेल्सिअस अंश नोंद आहे.
Web Title: Whether Alert winter wave, hood covered in Ahmednagar
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App