अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक पोलीस लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात
Ahmednagar Rahuri Crime: राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक लाच (Bribery)प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात, ₹ ४,०००/- लाचेची मागणी .
अहमदनगर: राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक लाच प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याची घटना समोर आली आहे. युनिट-अहमदनगर,तक्रारदार-पुरुष वय-३२,रा.मुलनमाथा, ता: राहुरी, जि.अहमदनगर
आरोपी-शाहमद शब्बीर शेख,पोलीस नाईक/१५६७, राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर
लाचेची मागणी-५,०००/-₹ तडजोड अंती ₹ ४,०००/- लाचेची मागणी ता.१३/१०/२०२२
लाचेचे कारण-तक्रारदार यांचे विरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे अदखलपात्र गुन्हा दाखल असून सदर अदखलपात्र गुह्यात तक्रारदार यांचे वर तहसिल कार्यालय,रा हुरी येथे चॉप्टर केस करण्यात आली असून, सदर चॉप्टर केस मध्ये मदत केल्याचे मोबदल्यात यातील आरोपी लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे कडे दि.१३/१०/२०२२ रोजी लाच मागणी पडताळणी दरम्यान राहुरी पोलीस स्टेशन येथे पंच साक्षीदार समक्ष तड़जोड अंती ४०००/- ₹ ची मागणी केली.म्हणून आज रोजी आरोपी लोकसेवक यांचेविरुद्ध राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा अधिकारी:-गहिनीनाथ गमे, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.अहमदनगर
पर्यवेक्षण अधिकारी हरीष खेडकर, पोलीस उप अधीक्षक,ला.प्र.वि,अहमदनगर,सहायक सापळा अधिकारी:-शरद गोरडे पोनि.ला.प्र.वि.अहमदनगर
सापळा पथक-पोलीस हवालदार/संतोष शिंदे,विजय गंगुल,पोना/रमेश चौधरी,पोलीस अंमलदार/रविंद्र निमसे,वैभव पांढरे,बाबासाहेब कराड,चालक हारून शेख, राहुल डोळसे
मार्गदर्शक-सुनील कडासने पोलीस अधीक्षक,ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक
नारायण न्याहळदे सो, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि नाशिक. सतिश भामरे, वाचक पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि.नाशिक परिक्षेत्र, नाशिक. आरोपीचे सक्षम अधिकारी पोलीस अधीक्षक, अहमदनगर
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की,त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी कींवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा.
अँन्टी करप्शन ब्युरो, अहमदनगर
दुरध्वनी- ०२४१- २४२३६७७
टोल फ्रि क्रं. १०६४
Web Title: policeman in Ahmednagar district in the net of bribery department
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App