प्रवरा नदीवरील पुलावरून तरुणीने उडी मारली अन….
Ahmednagar | Nevasa News: प्रवरा नदीवरील (River) पुलावरून तरुणीने उडी मारली, पोलिसांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ती बचावली.
नेवासा: नेवासा-श्रीरामपूर रस्त्यावरील प्रवरा नदीवरील पुलावरून नेवासा फाटा येथील युवतीने (वय२२) उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज सकाळी ८.१५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मात्र पोलिसांच्या व स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने ती युवती बचावली.
दरम्यान, या घटनेची माहीती समजताच पो.हे.कॉ.तुळशीराम गिते यांनी स्थानिक युवकांना सोबत घेऊन नदी पात्राकडे धाव घेतली. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी नदी पात्रालगत राहणाऱ्या सचिन गरुटे या युवकास नदी पात्रात चप्पू घेऊन जाण्यास सांगितले. सचिन याने सुमारे अर्धा तास अथक प्रयत्न करून सदर युवतीस वाचविले. त्यानंतर या युवतीस घरच्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर घटनेमागील कारण मात्र अद्याप समजू शकले नाही.
सदर घटनेची गांभीर्यता ओळखून तत्परता दाखवून युवतीस वाचविल्याबद्दल पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या हस्ते सचिन गरुटे व पो.हे.कॉ.तुळशीराम गीते यांचा सत्कार करण्यात आला.
Web Title: girl jumped from the bridge over Pravara river
See Latest Marathi News, Ahmednagar News and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App