Home अहमदनगर अहमदनगर: राहत्या घरात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

अहमदनगर: राहत्या घरात एकाची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar | Rahuri Suicide News:  एका वृद्धाने राहत्या घरात साडीच्या पदराच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना.

One committed suicide by hanging himself in a residential house

राहुरी: राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील अंबिकानगर येथे ९० वर्षीय वृध्दाने राहत्या घरात साडीच्या पदराच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली.

मुरलीधर भाऊ कोल्हे (वय ९०) हे घरात एकटेच राहत असत. अंबिकानगर येथे भाडोत्री घरात त्यांनी फाशी घेऊन जीवनयात्रा संपवली. जवळच राहणाऱ्या त्यांच्या बहीण जेवणाचा डबा घेऊन गेल्या असता त्यांना फाशी घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला.

घटनास्थळी देवळाली प्रवरा पोलीस चौकीचे पोलीस हेडकोन्स्टेबल प्रभाकर शिरसाठ, शशीकांत वाघमारे आदींनी पंचनामा केला. आजाराला कंटाळून मुरलीधर कोल्हे यांनी आत्महत्या केल्याचे समजते. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: One committed suicide by hanging himself in a residential house

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here