अकोलेतील चोरीच्या गुन्ह्यातील टोळी जेरबंद, चोरट्यांचा पर्दाफाश
Akole Theft: चोरीच्या घटनेतील आरोपींना अकोले पोलिसांनी गजाआड (Arrested) केले.
अकोले: मोटर सायकल ,इलेक्ट्रिक मोटारी, तसेच मंदिराच्या दानपेट्या फोडून भाविकांचे दान लांब विणाऱ्या चोरीचा अकोले पोलिसांनी पर्दाफाश केला. या चोरीच्या घटनेतील आरोपींना अकोले पोलिसांनी गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून 16 मोटरसायकली, पाच इलेक्ट्रिक मोटर तसेच चोरीतील 3 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
मागील काही दिवसापासुन अकोले पोलीस स्टेशन हद्दीत विविध चोऱ्यांचे प्रमाण वाढलेहोते. रात्रीच्या वेळी घरफोडी, वाहन चोरी, मंदिर चोरी करणारी टोळी सतर्क झालेली होती. सदर टोळीस पकडण्यासाठी व गुन्हेगारीस आळा घालण्यासाठी हिस्ट्रीशिटर चेक करणे, टु प्लस मधील आरोपींच्या वास्तव्याबाबत माहिती घेणे, नाकाबंदी, पेट्रोलींग करणे अश्या प्रकारच्या समांतर कारवाई चालु असताना व . हद्दीमध्ये गस्त सुरु असताना सपोनि मिथुन घुगे यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार 1) सागर विश्वनाथ मेंगाळ, 2) हर्षल संजय मँगाळ रा केळी रुम्हणवाडी ता अकोले या दोंघानी इलेक्ट्रीक मोटार व मोटार सायकल चोरी करुन त्याची विल्हेवाट लावणार असले बाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर दोन इसमांना ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून त्यांचेकडे तपास केला असता त्यांचे साथीदार 3) सोमनाथ शिवाजी भुंताबरे, 4) सुभाष रघुनाथ आगविले, दोन्ही रा चिंचाचीवाडी समशेरपुर ता अकोले 5 ) भास्कर खेमा पथवे रा नांदुरी दुमाला ता संगमनेर, 6) दिलीप पांडुरंग मेंगाळ केळी रुम्हणवाडी ता अकोले, हे या त सहभागी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. त्यावरुन सदर इसमांना ताब्यात घेतले असून त्यांनी मोटार सायकल इलेक्ट्रीक मोटार चोरी केल्याची कबुली दिली
पोलीस स्टेशन कडील गुन्ह्यामध्ये अटक करुन त्यांना मा. न्यायालयात हजर करुन त्यांची पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करुन घेवुन सदर रिमांड कालावधीमध्ये त्यांचेकडुन एकुण 3,20,000/- रुपयांच्या एकुण 16 मोटार सायकल व 55,000 रुपयांच्या एकुण 5 इलेक्ट्रीक मोटार असा मुद्देमाल हस्तगत केला 1) सोमनाथ शिवाजी भुंताबरे, 2) भास्कर खेमा पथवे, 3) सुभाष रघुनाथ आगविले अश्यांनी मिळुन मंदिरामध्ये चोरी केलेल्या रक्कम व मुद्देमालापैकी कोतुळेश्वर महादेव मंदिरातील दान पेटी मधील 2,000 रुपये रोख व पिंपळगाव नाकविंदा येथील महालक्ष्मी मंदिरामधील 10,000 रुपये किमतीच्या पादुका हस्तगत करण्यात यश आलेले आहे. तसेच ब्राम्हणवाडा येथे रात्रगस्त दरम्यान स्थानिक ग्रामस्थांच्या मदतिने मिळुन आलेला संशयीत इसमनामे 7) विजय लक्ष्मण काठे रा रंधा ता अकोले यास ताब्यात घेवून त्यास अटक केली असता अटके दरम्यान त्याचेकडुनही विविध गुन्ह्यातील 3 मोटार सायकल हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदर आरोपीत यांचेकडुन एकुण 3,87,000/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले असुनअकोले पोलीस स्टेशन मध्ये विवि दाखल गुन्हे उघडकीस आले आहे.
सदर आरोपीवर गुन्हे दाखल असुन सदर आरोपीवर जिल्हात तसेच जिल्हाबाहेर याच प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींकडे तपास सुरु असुन सदर आरोपींनी अकोले पोलीस स्टेशन हद्दीत व परिसरात केलेले चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री मनोज पाटील . अपर पोलीस अधिक्षकस्वाती भोर . उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राहुल मदने यांचे मार्गदर्शनाखाली अकोलेपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि मिथुन घुगे, पोउपनिरी भुषण हांडोरे, महिला पोउपनिरीफराहनाज पटेल, अकोले पोलीस स्टेशन नेमणुकीचे पोहेकॉ हरिदास लांडे, पोना अजित घुले, पोना रविंद्र वलवे, पोना गोराणे, चालक पोना गोविंद मोरे, पोना सोमनाथ पटेकर, पोना किशोर तळपे, पोना विठ्ठल शेरमाळे, पोना राजेंद्र कोरडे, पोना बाबासाहेब बड़े, पोकॉ प्रदिप बढे, पोकॉ संदिप भोसले, पोकॉ विजय खुळे, पोकॉ आत्माराम पवार, पोकॉ सुयोग भारती, पोकॉ अविनाश गोडगे, पोकॉ गणेश शिंदे, पोकॉ राहुल क्षीरसागर, पोकॉ विजय आगलावे, पोकॉ कुलदिप पर्बत, अपर पोलीस अधिक्षक कार्यालय श्रीरामपुर यांचेकडील नेमणुकीचे पोना फुरकान शेख यांनी केली असुन पुढील तपास अकोले पोलीस स्टेशनचे तपासी अमंलदार आहे.
Web Title: Akole theft gang Arrested, thieves exposed