अकोले: मेहंदूरी येथे सासरवाडीला गेले असता जावयास मारहाण: गुन्हा दाखल
अकोले: अकोले तालुक्यातील मेहंदूरी येथे भावजाई व पुतण्यांना शाळा सुरू झाल्याने आणण्यासाठी गेलेल्या संजय भानुदास हासे वय 45 वर्ष धंदा शेती राहणार चिखली तालुका संगमनेर यास मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याबाबत संजय भानुदास हासे यांनी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक १८ जुन रोजी सकाळी १०: ०० वाजेचे सुमारास मेहेंदुरी तालुका अकोले येथे संजय भानुदास हासे वय 45 वर्ष धंदा शेती राहणार चिखली तालुका संगमनेर हे त्याची भावजईचे माहेरी मेहेंदुरी येथून भावजाई व पुतण्यांना शाळा सुरू झाल्याने त्यांना आणण्यासाठी गेले असता यातील बाळासाहेब दगडू बंगाल, सचिन बाळासाहेब बंगाळ दोन्ही राहणार मेहेंदुरी तालुका अकोले यांनी मुलांना घेऊन जाण्यास नकार देऊन संजय भानुदास हासे बुक्क्यांनी मारहाण केली व आरोपी बाळासाहेब दगडू बंगाल यांनी लाकडी काठीने फिर्यादीचे डोक्यात व डाव्या पायावर मारून जखमी केले आहे. संजय भानुदास हासे यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात गु.रजिस्टर २३८/१९ भादवि कलम 324,323,504,506,34 गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वाघ हे करीत आहे.
Website Title: Akole Mehanduri Sasarwadi has gone to the gallows