Home अहमदनगर Rain Alert! अहमदनगर: पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

Rain Alert! अहमदनगर: पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा

Ahmednagar Rain Alert: १० ते १२ ऑक्टोबर दरम्यान वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता.

Heavy rain warning for next three days

अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात १० ते १२ ऑक्टोबर २०२२ या दरम्यान अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.  जिल्ह्यातून वाहणाऱ्या नदीमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष रहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातून वाहणार्‍या प्रवरा नदीत ओझर बंधारा 457 क्युसेस, गोदावरी नदीत नांदुरमध्यमेश्वर बंधार्‍यातून 1614 क्यूसेस व जायकवाडी धरणातून 18864 क्यूसेस, भिमा नदीस दौंड पूल येथे 5228 क्युसेस, घोडनदीत घोड धरणातून 3000 क्युसेस, सिना नदीत सिना धरणातून 717 क्यूसेस आणि मुळा नदीस मुळा धरणातून 1085 क्यू पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे जिल्ह्यातील नागरिकांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सखल भागात राहणार्‍या नागरिकांनी तात्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ यांनी केले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत 619.9 मि.मी (120 टक्के) पर्जन्यमान झालेले आहे. वादळी वारा, मेघगर्जनेसह वीजा पडणे व मध्यम स्वरूपाच्या पर्जन्यमानाची शक्यता वर्तविण्यात आलेली असून जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. अहमदनगर, पुणे व नाशिक जिल्ह्यातील विविध धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पर्जन्यमान सुरू असून अतिवृष्टी झाल्यास धरणाद्वारे सोडण्यात येणार्‍या विसर्गामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नागरिकांनी स्थानिक प्रशासनाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करावे. नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. पाणीपातळीत वाढ होत असल्यास नदीपात्रापासून तसेच ओढे व नाले यापासून दूर रहावे व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Heavy rain warning for next three days

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here